
मुंबई आणि आजुबाजूची उपनगरेही आमिबासारखी कुठूनही, कशीही अमर्याद वाढत आहेत. या शहरावर येणारा ताण हा मूळ प्रश्न आहे. त्याचे एक लक्षण म्हणजे रेल्वेगाड्यांमधील गर्दी. रेल्वेच्या अव्यवस्थापनाचे जसे ते बळी आहेत, त्याचप्रमाणे असमतोल विकासाचेही बळी म्हणावे लागतील.