'कोमट पाणी, लस घेतली' आतातरी लोकलप्रवास सुरु करा

प्रवासी संघटनांनी सरकार विरोधात सूर धरला
local train
local trainsakal media

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Infection) कमी करण्यासाठी ​सरकारकडून मास्क घाला, सामायिक अंतराचे (Social Distance) पालन करा, कोमट पाणी प्या असे आवाहन करण्यात आले. नागरिकांनी या आवाहनाला साद दिली. ज्यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केले, (Corona Rules Fine) त्यांना दंड ठोठावला. कोरोनाची लस आल्यानंतर नागरिकांनी लसीचे दोन डोस घेतले. आता कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे कोमट पाणी पिल्यानंतर, लस घेतल्यानंतर (Corona Vaccine) आता लोकल प्रवास सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेकडून करण्यात आली आहे. (Mumbai Local Train do start now taken warm water corona vaccine says travelers)

कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी सरकारने नियमावली जाहिर केली. लाॅकडाऊन, कडक निर्बंध, सौम्य, तीव्र, अंशतः असे वेगवेगळे निर्बंध लावण्यात आले. मात्र, आता कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाल्याने नियोजित वेळेनुसार बाजारपेठा खुल्या केल्या जातात. इतर अनेक क्षेत्रे सुरू झाली आहेत. त्यामुळे पर्यायी वाहतूकीची गर्दी आधीपेक्षा वाढली आहे. या गर्दीत कोरोनाचा प्रसार होणार नाही का ? की फक्त लोकलच्या गर्दीमध्येच कोरोनाचा प्रसार होईल, असा प्रश्न रेल्वे प्रवासी संघटनेकडून विचारण्यात येत आहे.

local train
लस उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्रावर गोंधळ, नागरिक संतापले!

अन्न, वस्त्र, निवारा या माणसांच्या मुलभूत गरजा आहेत. त्यानंतर शिक्षण आणि आरोग्य या महत्त्वाच्या गरजा आहेत. मात्र, सरकार आता फक्त आरोग्यावर लक्ष केंद्रीत करून अन्न, वस्त्र, निवारा यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. लोकल प्रवासातून जाण्याचा परवानगी मिळाली तर, प्रत्येकजण आपआपल्या मुलभूत गरजा सोडवू शकतो. सरकारने दिलेल्या आवाहनाला नागरिकांनी साद दिली. त्यामुळे आता प्रवाशांच्या मागणीची दखल सरकारने घेतली पाहिजे. सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास सुरू झालाच पाहिजे. अन्यथा आंदोलनाचा पर्याय निवडून सर्व निर्बंध मोडून काढू, असे आव्हान उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघाच्यावतीने सरकारला करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com