esakal | बेलापूर-सीवूड-उरण रेल्वे प्रकल्पासाठी केंद्राकडून अपेक्षाभंग; परिसरातील प्रवाशांचा हिरमोड
sakal

बोलून बातमी शोधा

बेलापूर-सीवूड-उरण रेल्वे प्रकल्पासाठी केंद्राकडून अपेक्षाभंग; परिसरातील प्रवाशांचा हिरमोड

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात बेलापूर- सीवूड-उरण दुहेरी रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी फक्त 20 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

बेलापूर-सीवूड-उरण रेल्वे प्रकल्पासाठी केंद्राकडून अपेक्षाभंग; परिसरातील प्रवाशांचा हिरमोड

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई  : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात बेलापूर- सीवूड-उरण दुहेरी रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी फक्त 20 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पाला 100 कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पावर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. तर, एमयूटीपीच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी 650 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पांना चालना मिळण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. 

उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांचा रोजचा प्रवास काहीसा सुखद, वेगवान आणि सुरक्षित होण्यासाठी अनेक प्रकल्प राबवले जात आहेत. मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे (एमआरव्हीसी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) हाती घेतले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात एमयूटीपी 2, एमयूटीपी 3 आणि 3 ए करिता निधी मंजूर केला आहे. यात एमयूटीपी 2 साठी 200 कोटी , एमयूटीपी 3 करता 300 कोटी तर, एमयूटीपी 3 ए मधील प्रकल्पांसाठी 150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या रक्कमे एवढीच रक्कम राज्य सरकार देणार आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पांचे काम सुरू करणे एमआरव्हीसीला शक्‍य होईल. 

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी क्लिक करा

एमयुटीपी 2 - 200 कोटी 
ठाणे ते दिवा पाचवी-सहावी मार्गिका, मुंबई सेंट्रल ते बोरीवली सहावी मार्गिका, सीएसएमटी-कुर्ला पाचवी-सहावी मार्गिका 

एमयुटीपी 3- 300 कोटी 
विरार ते डहाणू चौपदरीकरण, पनवेल ते कर्जत दुहेरी रेल्वे मार्ग, ऐरोली ते कळवा लिंक रोड, 47 वातानुकूलित लोकल, रूळ ओलांडण्याचे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना 

एमयुटीपी 3 ए - 150 कोटी 
सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्ग, 210 वातानुकूलित लोकल,0 पनवेल ते विरार उपनगरीय मार्ग, सीबीटीसी नवीन सिग्नल यंत्रणा 

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )
mumbai local train latest update union budget 2021 belapur seawoods uran unnat railway project marathi navi mumbai latest