esakal | सर्वात मोठी बातमी : सर्वसामान्यांसाठी १ फेब्रुवारीपासून मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सुरु होणार : उद्धव ठाकरे

बोलून बातमी शोधा

सर्वात मोठी बातमी : सर्वसामान्यांसाठी १ फेब्रुवारीपासून मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सुरु होणार : उद्धव ठाकरे

सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल. 

सर्वात मोठी बातमी : सर्वसामान्यांसाठी १ फेब्रुवारीपासून मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सुरु होणार : उद्धव ठाकरे
sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई  :  कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती. मात्र आता येत्या १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यामुळे सर्वाना मुंबईची लाईफलाईन लोकलमधून प्रवास करता येईल. तसेच मुंबईकरांची होणारी गैरसोयही टळेल. याशिवाय मुंबई आणि उपनगरातील विविध कार्यालये, आस्थापना यांनी कामाच्या वेळांमध्ये सुधारणा करावी जेणे करून सर्वाना सुविधा होईल असेही यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात  म्हटले आहे.  

विशिष्ट वेळांच्या मर्यादेत  मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे बैठक झाली होती. यात वरिष्ठ रेल्वे अधिकारी देखील उपस्थित होते. 

सर्व प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्यासाठी गर्दी होणार नाही व आरोग्याचे नियम पाळले जातील याची काळजी घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले होते, त्याप्रमाणे सर्वसामान्य प्रवाशांसाठी खालीलप्रमाणे ही सेवा उपलब्ध असणार आहे : 

कधी प्रवास करता येईल:

सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल. 


कधी प्रवास करता येणार नाही:

सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवांत प्रवास करता येणार नाही. या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील.

सर्वांसाठी लोकल प्रवासाची सुविधा नेहमीप्रमाणे सुरु करण्याची  आवश्यकता लक्षात घेऊन मुंबई व उपनगर परिसरातील कार्यालये आणि आस्थापने यांनी आपापल्या कार्यालयीन वेळेमध्ये आवश्यक तो बदल करावा अशी विनंती देखील मुख्य सचिव यांच्या या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

mumbai local train news common man can now travel from mumbai local train from 1st February