esakal | ठाणे ते दिवा धीम्या मार्गावर लोकल सेवा सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai train

ठाणे ते दिवा धीम्या मार्गावर लोकल सेवा सुरु

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईत शनिवारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळं (Heavy Rainfall) जनजीवन विस्कळीत झालं आहे. काळरात्र बनून कोसळलेल्या पावसानमुळं आतापर्यंत ३० पेक्षा जास्त नागिरकांचा मृत्यू (People Death) झाला आहे. मुंबईत अजूनही पावसाची (Mumbai Rain) संततधार सुरुच आहे. त्यामुळे मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेलाही (Central Railway) बसला आहे. मध्य रेल्वेच्या कळवा स्टेशन दरम्यान रुळावर पाणी साचल्यमुळे काही वेळासाठी लोकलसेवा बंद (Local Stopped) ठेवण्यात आली होती. धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात आली आहे. ठाणे ते दिवा धीम्या मार्गावरील लोकल सेवा सुरु झाली आहे. (Mumbai Local Train Stops on Central railway Due to water lodging on track-nss91)

loading image