Mumbai local train update: आज मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, असे असेल वेळापत्रक

Mumbai local train update: आज मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, असे असेल वेळापत्रक

मुंबई: मध्य रेल्वेच्या उपनगरी भागांवर देखभालीच्या काम करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. ब्लॉक कालावधीत विशेष उपनगरी रेल्वे गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई -वाशी विभागात चालविण्यात येतील. तर ब्लॉक कालावधीत ठाणे -वाशी स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.

कुठे
ठाणे - कल्याण अप व डाउन  जलद मार्गावर
कधी
सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत

परिणाम

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.37 ते दुपारी 2.48 वाजेपर्यंत सुटणा-या जलद सेवा ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळविली जाईल व ठाणे आणि कल्याण दरम्यानच्या सर्व  स्थानकांवर थांबेल.  तर कल्याण येथून सकाळी 10.26  ते दुपारी 3.19 वाजेपर्यंत सुटणा-या अप जलद सेवा कल्याण व ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येणार असून कल्याण व ठाणे स्थानकांदरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. मुलुंड येथे अप जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील व पुढे निर्धारित थांब्यांवर थांबतील.

कुठे

पनवेल - वाशी अप व डाउन हार्बर मार्गावर, बेलापूर, नेरुळ-खारकोपर मार्गास
कधी
सकाळी 11.5 ते दुपारी 4.5 वाजेपर्यंत

परिणाम

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या दिशेने पनवेल, बेलापूर येथून सकाळी 10.49 ते दुपारी 4.1 वाजेपर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.3 ते दुपारी 3.16 वाजेपर्यंत सुटून पनवेल, बेलापूरला जाणा-या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

तर अप ट्रान्सहार्बर मार्गावर पनवेल येथून सकाळी 11.2 ते दुपारी 3.33 या वेळेत ठाणेकडे जाणा-या  सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.1 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेल, बेलापूर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

mumbai local train update central railway mega block december 13 check timings

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com