गर्दीचे शून्य नियोजन, लोकलमध्ये अनेक प्रवाशांचा विना मास्क प्रवास

गर्दीचे शून्य नियोजन, लोकलमध्ये अनेक प्रवाशांचा विना मास्क प्रवास

मुंबई:  सर्वसामान्य प्रवाशांना ठराविक वेळेत लोकल प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. यावेळी राज्य सरकारने कोरोना नियमांचे पालन करण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला दिले होते. मात्र, मागील 14 दिवसांत राज्य सरकारकडून दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. लोकलमध्ये अनेक प्रवासी विना मास्क प्रवास करत आहेत. लोकलमध्ये एका बाकावर चौथा सीटवर बसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे गर्दीचे शून्य नियोजन आहे, असे दिसून येत आहे. 

मुंबई उपनगरात कोरोना नियंत्रणात येत असताना लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी 'मास्क नाही, प्रवेश नाही' असे घोषवाक्य तयार करण्यात आले. मात्र कोरोना नियमांचे आखून दिलेल्या नियमांचे आणि घोषवाक्याचे लोकल प्रवासात पूर्णतः तीन तेरा वाजले आहे. लोकलमध्ये फिजिकल डिस्टंसिंग पालन होत नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा बल यांच्या कामावर प्रवासी संघटनेकडून निराशा व्यक्त केली आहे. रेल्वे प्रशासनाने कठोर पावले उचलायला हवी आहेत, अशी मागणी प्रवासी संघटनेकडून करण्यात येत आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विना मास्क लोकल प्रवासासाठी मुभा नाही. तरी अनेक रेल्वे स्थानकावरून प्रवाशांचा विना मास्क प्रवास होत आहे. आबालवृद्ध विना मास्क प्रवास करत असल्याने कोरोना रुग्ण पुन्हा वाढत आहेत. रेल्वे आणि  महापालिका प्रशासनाचे पाचशेपेक्षा जास्त पथक कारवाईसाठी आहे. मात्र हे पथक फक्त महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरच आहेत.  इतर, छोट्या-मोठ्या रेल्वे स्थानकावर हे पथक दिसून येत नाही. त्यामुळे इतर स्थानकातून प्रवासी विना मास्क प्रवास करताना दिसून येत आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 
राज्य सरकारने दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन रेल्वे प्रशासनाकडून होत आहे. प्रवासी चौथ्या सीटवर बसू लागले आहेत. लोकलमध्ये विना मास्क प्रवासी फिरत आहेत. रेल्वे पोलिस, आरपीएफ, महाराष्ट्र सुरक्षा बल, होमगार्ड, महापालिका कर्मचारी यांनी कठोर पावले उचलून कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यावर कारवाई केली पाहिजे. फक्त महत्वाच्या स्थानकावरच कारवाई न करता प्रत्येक लहान-मोठ्या स्थानकावर कारवाई करणारे पथक उभे करावेत.
नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ

प्रवाशांनी कोरोना नियमांचे पालन करावे, यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे. यासह प्रवाशांनी देखील नियम पाळले पाहिजेत. रेल्वे प्रशासनाने स्टिकर चिटकवून, बॅनर लावून, लोकलमध्ये उद्घोषणा करून जबाबदारी झटकू नये. लोकलमध्ये, रेल्वे परिसरात नियमांचे पालन करून घेणे आवश्यक आहे. 
वंदना सोनवणे, सदस्या, क्षेत्रीय रेल्वे प्रवासी समिती, मध्य रेल्वे
 
उपनगरीय लोकलमधून सर्वसामान्यांना प्रवाशांना मुभा दिल्यानंतर कोरोनाची रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली आहे.  मागील 14 दिवसांपासून दरदिवशी 300 ते 500 रुग्णांची वाढ होत आहे.  

मध्य रेल्वे प्रशासनाकडून मुख्य मार्गिकेवर 100 टक्के आणि इतर मार्गिकेवर 95 टक्के क्षमतेने लोकल चालविल्या जात आहेत. याशिवाय, सर्व तिकीट खिडक्या, सर्व एटीव्हीएम मशीन, युटीएस मोबाईल ॲप चालू केले आहेत.  सघन तिकीट मोहीम हाती घेऊन विनातिकीट प्रवास करण्यावर तसेच विविध महापालिका यांच्या मदतीने विना मास्क प्रवेश करण्यावर कारवाई केली जात आहे. 
शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai local train update many passengers travel Without mask 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com