Mumbai Local Viral Video : मुंबई लोकलमध्ये 'बाप्पा मोर्या'ने जिंकली नागरिकांची मनं | Mumbai Local Viral Video: In Mumbai Local, 'ganpati Bappa Morya' won the hearts of ganesh chaturthi ganesh utsav | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Local Viral Video

Mumbai Local Viral Video : मुंबई लोकलमध्ये 'बाप्पा मोर्या रे'ने जिंकली नागरिकांची मनं

Mumbai Local Viral Video गेल्या काही दिवसांपासून मुंबई लोकलमधील विविध व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. कधी व्हिडिओ सकारात्मक तर कधी नकारात्मक असतात. मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्यावर नेटकरी कमेंट करताना पाहायला मिळतात आणि आपले मत व्यक्त करतात.

यातच आता एका लोकल ट्रेनमध्ये एक व्यक्ती गणपती बाप्पाची आरती आणि गाणे म्हणतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून नागरिक याला चांगलीच प्रसिद्धी देत आहेत.

लोकल मधुन प्रवास करणे म्हणजे लहान बाब नाही. याचे कारण म्हणजे लोकलमध्ये असणारी प्रचंड गर्दी. मात्र अशा गर्दीतही स्वतःची कला दाखवायला काही मुंबईकर मागे हटत नाहीत. ते तर स्वतः ही गातात आणि दुसऱ्यांना देखील आनंद देतात

सध्या मुंबई लोकल इतकाच मुंबईकरांसाठी महत्त्वाचा असणाऱ्या गणपती उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. लोकल ट्रेनमध्ये काही प्रवासी गणरायाची आरती गात आहेत असे पाहायला मिळत आहे. आरती सोबतच बाप्पाचे गाणेही हे प्रवासी गात असल्याचे पाहायला मिळत आहे.

या व्हिडिओमध्ये 'बाप्पा मोरया रे' हे सुप्रसिद्ध गाणे संबंधित व्यक्ती गात असून या गाण्याला चांगलीच पसंती नेटकरी देत आहेत. तब्बल तीन मिलियनहून अधिक लोकांनी हा व्हिडियो पहिला आहे. suhas_bandagale_19 यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.