esakal | Maharashtra Lockdown: फक्त 'या' लोकांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा

बोलून बातमी शोधा

Local
Maharashtra Lockdown: फक्त 'या' लोकांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा
sakal_logo
By
कुलदिप घायवट

मुंबई: कोरोनाचा व्हायरसचा वाढता प्रार्दुभाव पाहता ही साखळी तोडण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आज रात्री ८ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात कडक लॉकडाऊन असेल. राज्य सरकारने 'ब्रेक द चेन' अंतर्गत लोकल, मेट्रो, मोनो प्रवासात फक्त सरकारी, वैद्यकीय कर्मचारी आणि गंभीर रुग्णांना उपचार घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या सुचनेनुसार रेल्वे, मेट्रो, मोनो प्रशासनाने खबरदारीची पावले उचलली आहेत. स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. यासह स्थानकावर रेल्वे पोलिसांच्या माध्यमातून बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे. याशिवाय खासगी प्रवासासाठी जिल्हा बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

लांब पल्ल्यांच्या गाड्या जिथे थांबतात, त्यांची थर्मल चेकिंग केली जात आहे. यासह कोरोना चाचणी केली जात आहे. लोकल प्रवासात कोणत्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे, याची यादी अद्याप आली नाही. नवीन यादी जाहीर झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कॅटेगिरीप्रमाणे लोकल प्रवासात परवानगी देण्यात येईल. यासह आता रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वार बंदी करण्यासाठी सुरूवात केली आहे, अशी माहिती लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

राज्य सरकारने दिलेल्या सुचनांचे पालन केले जाणार आहे. आज लोकल फेऱ्यांबाबतचे नियोजन केले जाणार आहे. काही स्थानकांचे प्रवेशद्वार बंद केले आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार त्यांचे पालन करण्यात येईल, असे मेट्रो आणि मोनो प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

------------

(संपादन- पूजा विचारे)

mumbai lockdown news only essential service personnel allowed travel local train