

मुंबई : महाराष्ट्र पोलिसांना राज्य राखीव पोलीस दलातील हवालदार, चालक तसेच कर्मचाऱ्यांच्या 18331 पदांसाठी 11 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.एवढ्या मोठ्या संख्येने इच्छुकांनी फॉर्म भरण्यासाठी सरकारी पोर्टलवर लॉग इन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे, वेबसाइट जॅम होण्यासारख्या समस्या झाल्या होत्या, परंतु त्या दुरुस्त करण्यात आल्या.
नोकरीसाठी इच्छुकांपैकी अनेकांनी फॉर्म भरण्यासाठी रात्री उशिरापर्यंत वेबसाइटवर नोंदणी करण्याचा प्रयत्न केला.9 नोव्हेंबरपासून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले असून बुधवारी नोकरीसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. सोमवार दुपारपर्यंत, प्रशासनाला 10.74 लाख अर्ज आले होते, परंतु मंगळवार पर्यंत 11 लाखांहून अधिक अर्ज आल्याची माहिती मिळत आहेत. 30 नोव्हेंबर बुधवार हा अर्ज करण्याचा शेवटचा दिवस असून इच्छुक उमेदवारांच्या अर्जाचा आकडा अजून वाढण्याची चिन्हे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.