esakal | मुंबईकरांना मलेरियाचा ताप वाढला; डेंग्यू, गॅस्ट्रोचे लक्षणीय रुग्ण | Malaria Patients
sakal

बोलून बातमी शोधा

Dengue, malaria patients

मुंबईकरांना मलेरियाचा ताप वाढला; डेंग्यू, गॅस्ट्रोचे लक्षणीय रुग्ण

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईत (Mumbai) साथीच्या आजारांतील मलेरियाचा (malaria) ताप वाढला असून डेंग्यू (dengue) आणि गॅस्ट्रोची देखील त्याला साथ आहे. या वर्षात आतापर्यंत मुंबई शहर व उपनगरात मलेरियाचे 4,172 रुग्ण (malaria patients) आढळून आले असल्याचे पालिकेच्या (bmc) आरोग्य विभागाकडून (health authorities) सांगण्यात आले. पावसाच्या उघडझाप स्थितीने डेंग्यू व मलेरिया डासांचीे वाढ होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असल्याने मुंबईत मलेरियाचे रुग्ण वाढत आहेत.

हेही वाचा: मुंबई: पश्चिम रेल्वेवर रशियन बनावटीचे सीसीटीव्ही कॅमेरे

यावर्षी जून, जुलै, ऑगस्ट, सष्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात मुंबई शहरात मलेरिया रुग्णांच्या संख्येत चढ-उतार दिसून आला. 2020 च्या तुलनेत यंदाच्या वर्षात मलेरियाच्या रुग्णसंख्येत किंचित घट असली तरीही, मलेरिया रोखण्यासाठी पालिकेला अपयश येत असल्याची टिका होत आहे. मलेरिया प्रतिबंधांसाठी पालिका करत असलेल्या उपाययीजना तोकड्या पडत असल्याची तक्रार लोकप्रतिनिधी करत आहेत. तर नागरिकांमध्येही जनजागृतीचा अभाव असल्याचेही समोर येत आहे.

ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत मलेरियाचे 169 रुग्ण आढळून आले आहेत. तर लेप्टो 17, डेंग्यू 97, गॅस्ट्रो 73, हेपाटायटीस 13, चिकनगुनिया 15, एच1एन1चे 4 रुग्ण आढळून आल्याचे पालिकेच्या अहवालातून समोर आले आहे. 2019 मध्ये मलेरियाचे 4,357 रुग्ण आढळले होते. तर 2020 मध्ये 5007 आणि 2021 मध्ये आतापर्यंत 4,172 रुग्ण आढळले आहेत.

तसेच, दरवर्षी साथीच्या आजाराने अनेकांचा मृत्यू होतो. त्यामुळे आजार व मृत्यू रोखण्यासाठी पालिकेकडून विशेष उपाययोजना करण्यात येतात. यंदाच्या वर्षात साथीच्या आजारांनी 7 जणांचा बळी घेतला आहे. यात लेप्टोने 4 जणांचा बळी घेतला आहे, तर डेंग्यूने 3 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

वर्षभरातील साथरोग (1 जानेवारी ते 10 ऑक्टोबर 2021)

आजार     रुग्ण   मृत्यू

मलेरिया 4172    0

लेप्टो     196       4

डेंग्यू       573       3

गॅस्ट्रो       219      0

हेपटीटीस 206     0

चिकुनगुनिया 30    0

एच1एन1    59     0

loading image
go to top