आधीच इंधन दरवाढीचा चटका; त्यात टॅक्सी रिक्षाच्या भाडेवाढीने मुंबईकरांची होरपळ

प्रशांत कांबळे
Monday, 22 February 2021

अखेर टॅक्सी, रिक्षाला पहिल्या टप्यात प्रत्येकी 3 रुपये आणि प्रति किलोमीटर 2 रुपये भाडे वाढीची मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाने राज्य सरकारकडे शिफारस केली

मुंबई : अखेर टॅक्सी, रिक्षाला पहिल्या टप्यात प्रत्येकी 3 रुपये आणि प्रति किलोमीटर 2 रुपये भाडे वाढीची मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाने राज्य सरकारकडे शिफारस केली. त्यानुसार सोमवारी एमएमआरटीए च्या बैठकीत यावर निर्णय होऊन परिवहन मंत्री अनिल परब यांनी खटूवा समितीच्या निर्देशानुसार रिक्षा, टॅक्सीची नवीन भाडे दरवाढीची घोषणा केली. नवीन भाडेवाढ 1 मार्च पासून मुंबई महानगरात लागू होणार आहे.

राज्य सरकारने 2015 नंतर टॅक्सी रिक्षाला भाडेवाढ केली नाही. तर कोरोनाच्या महामारीच्या काळात सर्व क्षेत्र अडचणीत असतांना, टॅक्सी, रिक्षाला दरवाढ देणे आवश्यक होते. त्यामुळे खटूवा समितीमध्ये भाडेवाढ ठरविण्यासाठी ठरवून दिलेल्या सूत्रानुसार भाडेवाढ करण्यात आली आहे. शिवाय या भाडेवाढीसाठी विमा, सीएनजी दर, वाहन कर्ज व्याज दर, व्यवसाय कर, परवाना शुल्क, वाहन रक्कम, ग्राहक निर्देशांक यांचा अभ्यास करण्यात आल्याचे ही परब यांनी स्पष्ट केले.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन भाडेवाढ 1 मार्च पासून मुंबई महानगरात लागू होणार असून, रिक्षा, टॅक्सी चालक, मालकांना त्यांचे मिटर कलिब्रेशन करण्यासाठी तीन महिन्यांनी मुदत दिल्या जाणार आहे. त्याप्रमाणे 1 जून पासून टॅक्सी आणि रिक्षाच्या मीटरवर नवीन दर दिसणे बंधनकारक राहणार असल्याचेही परब यांनी सांगितले आहे.

 

रिक्षासाठी नवीन भाडेवाढ 
पहिल्या टप्याला रिक्षाला आता 18 रुपये आकारल्या जाते, यामध्ये 3 रुपयांची वाढ करून नवीन भाडे दरवाढ लागू झाल्यानंतर 21 रुपये मोजावे लागणार आहे. तर यापूर्वी पहिल्या टप्यानंतर दर किलोमीटर 12.1 रुपये आकारल्या जात होते. त्यामध्ये 2.1 रुपयांची वाढ करून आता दर किलोमीटर 14 रुपये 20 पैसे आकारल्या जाणार आहे.

 

टॅक्सीची नवीन भाडेवाढ
पहिल्या टप्यात टॅक्सीला आता 22 रुपये आकारल्या जाते. यामध्ये 3 रुपये वाढ करून नवीन भाडे दरवाढ लागू झाल्यानंतर 25 रुपये मोजावे लागणार आहे. तर यापूर्वी पहिल्या टप्यानंतर दर किलोमीटर 14.3 रुपये आकारल्या जात होते. त्यामध्ये 2.9 रुपये वाढ करून आता दर किलोमीटर 16 रुपये 93 पैसे आकारल्या जाणार आहे.

--------------------------------------------

( Edited By Tushar Sonawane )

mumbai marathi breaking Taxi, rickshaw fare hike of Rs 3 each in Mumbai metro region latest updates


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai marathi breaking Taxi, rickshaw fare hike of Rs 3 each in Mumbai metro region latest updates