मराठी शिवसेना वसई मध्येही हिंदी भाषा भावनांच्या प्रेमात

तर मराठी एकीकरण समितीची मराठी भाषा भवनाची मागणी
मराठी एकीकरण समिती
मराठी एकीकरण समितीsakal

विरार : मीरा भाईंदर मध्ये हिंदी भाषा भवन उभारण्याची घोषणा शिवसेनेने केल्यावर मोठा गदारोळ झाला होता. आता मणिरा भाईंदर पाठोपाठ हिंदी भाषिकांना खुश करण्यासाठी पालघरचे पालक मंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे हिंदी भाषा भवन उभारण्याची मागणी शिवसेना उप तालुका प्रमुख दिवाकर सिंगयांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

मराठीचा आग्रह धरणारी शिवसेना सद्या हिंदी भाषेच्या प्रेमात असल्याचे दिसत आहे. तर दुसर्या बाजूला या वादात उडी घेताना मराठा एकीकरण समिती आणि गावपरिवर्तन समिती गावराई पाडा यांनी जिल्हा धिकाऱ्याकडे मराठी भाषा भवन उभारण्याची मागणी केल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाषा भवनाचा वाद रंगणार असल्याचे बोलले जात आहे.

मराठी एकीकरण समिती
हिंगोली : परप्रांतीय पणत्यांवर हिंगोलीकरांची दिवाळी

वसई विरार महापालिकेची निवडणूक जसजशी जावळ येऊ लागली आहे तसतशी येथील मतदारावर आश्वासनाची खैरात आता पासून सुरु झाली आहे. सद्या वसई तालुक्यात हिंदी भाषिकांची संख्या मोठी असल्याने एकेकाळी मराठीचा आग्रह धरणारी शिवसेना मराठी भावना ऐवजी हिंदी भाषा भवनाला प्राधान्य देऊ लागल्याचे दिसत आहे. यापूर्वी मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने हिंदी भाषा भवनाची घोषणा केल्याने मोठी खळबळ उडाली होती. वसई विरार मध्ये मराठी माणूस पहिला असताना शिवसेनेने मराठी भाषा भवनाकडे पाठ फिरून हिंदी भाषा भवनाला प्राधान्य दिल्याने हि निवडणुकीची खेळी असल्याचे बोलले जात आहे.

तर आता दुसर्या बाजूला मराठी एकीकरण समिती आणि गाव परिवर्तन समिती गावराई पाडा यांनी काल थेट जिल्हाधिकाऱयांना भेटून वसई मध्ये मोठे मराठी भाषा भवन उभारण्याची मागणी केली आहे, त्याच बरोबर त्यांनी आपल्या पत्रात परराज्यातील लोकं जे इथे राजकीय पक्षाचे पदाधिकारी होऊन राजकीय दुकानदारी चालवत आहेत ते हिंदी भाषा भवनाची मागणी करून इथला समाजिक सलोखा बिघडविण्याचे काम करीत असल्याचा आरोप जिल्हाधिकाऱयांना दिलेल्या पत्रात केला आहे. त्यांनी आपल्या पत्रात वसई ही भूमी ऐतिहासिक भूमी आहेच सोबतच येथे आगरी, कोळी, कुणबी, वाडवळ, भंडारी, सामवेदी ब्राह्मण, पांचकळशी, आदिवासी, कुपारी हे समाज वर्षानुवर्षे इथे गुण्यागोविंदाने राहत असल्याने इथल्या चालीरीती, परंपरेकडे संपूर्ण महाराष्ट्र हा एक अमूल्य सांस्कृतिक ठेव्याचे प्रतीक म्हणून पाहतो.

मराठी एकीकरण समिती
मराठा समाजाशी गद्दारी केली नाही : अशोक चव्हाण

वसईतील अनेक साहित्यिकांनी मराठी भाषेसाठी अमूल्य असे योगदान दिले ज्यांत 'महाराष्ट्राचे पाणिनी' आणि 'मराठी भाषेचे व्याकरणकार' म्हणून वसईचे सुपुत्र 'स्वर्गीय दादोबा पांडुरंग तर्खडकर' यांनी सन 1836 साली वयाच्या 25 व्या वर्षी मराठी भाषेचे व्याकरण लिहिले; त्यांचे मराठी भाषेसाठी दिलेलं योगदान हे न विसरता येण्याजोगे आहे. दादोबांच्या कार्याचा यथोचित गौरव होण्यासाठी वसईत 'मराठी भाषा भवन' उभारण्याबाबतची मागणी सर्व समाजबांधव कित्येक वर्षांपासून करीत आहेत.

वसई विरार मध्ये येथील स्थानी भूमी पुत्र हा मराठी आहे. त्यामुळे याठिकाणी भव्य असे मराठी भाषा भवनच झाले पाहिजे . सद्या सत्तेवर मराठीचा आग्रह धरणारे सरकार असल्याने त्यांनी या मागणीकडे लक्ष द्यावे .

सागर पाटील , मराठी एकीकरण समिती ,वसई तालुका उपाध्यक्ष

वसई विरार शहरातील हिंदी भाषिकांची वाढती लोकसंख्या पाहता येथे हिंदी भाषा भवन असणे गरजेचे आहे. हिंदी भाषा भवनामध्ये संमेलन कक्ष, पुस्तकालय आणि हिंदी भाषेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देश्याने अन्य सेवा सुविधा सामील असाव्यात वसई विरार मध्ये हिंदी भाषा भवन उभारल्यास हिंदी भाषीक जनतेला प्रोत्साहन मिळेल.

दिवाकर सिंग , शिवसेना उपतालुका प्रमुख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com