BMCचा मनमानी कारभार समोर; माहितीचा अधिकारासाठी हमीपत्राची मागणी

तेजस वाघमारे
Saturday, 23 January 2021

माहिती अधिकार कायद्याखाली माहिती मागविणाऱ्या अर्जदाराला माहितीचा गैरवापर करणार नाही, असे हमीपत्र लिहून देण्यास महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई : माहिती अधिकार कायद्याखाली माहिती मागविणाऱ्या अर्जदाराला माहितीचा गैरवापर करणार नाही, असे हमीपत्र लिहून देण्यास महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. कायद्यात अशा प्रकारचे हमीपत्र लिहून देण्याची तरतूद नसल्याने याप्रकरणी अर्जदार राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तांकडे तक्रार करणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिका शिक्षण विभागाचा मनमानी कारभार समोर आला आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

अर्जदार शेखर सावंत यांनी गोरेगाव येथील यशोधाम हायस्कूल विषयीची माहिती अधिकार कायद्यातंर्गत माहिती मागविली होती. सुरूवातीला विनाअनुदानित शाळा सार्वजनिक प्राधिकरण संस्थेत मोडत नसल्याने या शाळेला माहिती अधिकार कायदा लागू होत नाही, असे पालिकेच्या वतीने कळवण्यात आले होते. मात्र, अर्जदाराचे समाधान न झाल्याने अपीलीय अधिकाऱ्यांच्या समोर याप्रकरणाची प्रथम सुनावणी पार पडली. यावेळी अर्जदाराने सदर शाळेची माहिती कशासाठी मागविली आहे, याचा उल्लेख नसल्याने पालिकेकडून मिळालेल्या शाळेच्या माहितीची गैरवापर करणार नाही, असे हमीपत्र देण्यास अर्जदाराला सांगण्यात आले.

'mumbai marathi news Arbitrary working of BMC Request for Guarantee for Right to Information

--------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai marathi news Arbitrary working of BMC Request for Guarantee for Right to Information