Diesel Price Hike | इंधन दरवाढीमुळे वाहतूकदार आर्थिक संकटात; संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

प्रशांत कांबळे
Saturday, 23 January 2021

सातत्याने वाढत असलेल्या डिझेल दरामुळे प्रवासी आणि माल वाहतूकदार आर्थिक संकटात सापडले आहे.

मुंबई  ः सातत्याने वाढत असलेल्या डिझेल दरामुळे प्रवासी आणि माल वाहतूकदार आर्थिक संकटात सापडले आहे. केंद्राने आतापर्यंत दोन वेळा इंधनावरील कर वाढवल्याने वाहतूकदारांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. लॉकडाऊनमुळे आधीच वाहतूकदारांचा व्यवसाय तोट्यात असल्याने इंधन दरवाढीमुळे वाहतूकदारांचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. 

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

देशातील तेल कंपनीने आंतरराष्ट्रीयस्तरावर इंधनाचे दर कमी केले आहेत. मात्र, केंद्र सरकारने इंधनावर वाढवलेला अबकारी कर व राज्य सरकारने वाढवलेला व्हॅटमुळे देशातील वाहतूकदार आणि सर्वसामान्य नागरिकांना त्याचा कोणताही फायदा झाला नाही. इंधनाचे दर गगनाला भिडले असून डिझेलच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. त्याचा वाहतूकदारांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे इंधनावरील अबकारी कराचे दोन वेळा वाढवलेले एकूण 31.83 रुपये प्रतिलिटर कराची रक्कम कमी करावी, अशी मागणी ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट कॉंग्रेसचे सदस्य बाबा शिंदे यांनी केली आहे. येत्या 15 दिवसांत मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. 

इंधनावरील अबकारी कर कमी करण्याच्या मागणीसाठी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. येत्या 15 दिवसांमध्ये ही मागणी पूर्ण न झाल्यास वाहतूकदारांकडून देशपातळीवर आंदोलन केले जाईल. 
- बाबा शिंदे,
सदस्य, ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट कॉंग्रेस, नवी दिल्ली 

mumbai marathi news Diesel Price Hike Carriers in financial crisis due to fuel price hike

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai marathi news Diesel Price Hike Carriers in financial crisis due to fuel price hike