रिपब्लिक टीव्हीविरोधातील कारवाई केवळ कुहेतूने; अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात कोणताही पुरावा नाही

अनिश पाटील
Wednesday, 10 February 2021

बनावट टीआरपी प्रकरणात मुंबई पोलिसांना रिपब्लिक टीव्ही आणि मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात कोणताही पुरावा नाही, केवळ कुहेतूने पोलिस कारवाई करीत आहेत, असा दावा रिपब्लिककडून करण्यात आला आहे. 

मुंबई  : बनावट टीआरपी प्रकरणात मुंबई पोलिसांना रिपब्लिक टीव्ही आणि मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात कोणताही पुरावा नाही, केवळ कुहेतूने पोलिस कारवाई करीत आहेत, असा दावा रिपब्लिककडून करण्यात आला आहे. 

बनावट टीआरपी प्रकरणात एआरजी आऊटलिअर यांच्या वतीने मंगळवारी पुरवणी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. यात पोलीस एआरजीविरोधात नाहक कारवाई करीत आहेत, त्यांना आमच्याविरोधात पुरावा मिळण्यात अपयश आले आहे. केवळ पालघर साधु हत्येचे वार्तांकन केले म्हणून पोलीस आकस ठेवला जात आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई पोलिसांनी कंपनीविरोधात पुरावा असल्याचा दावा केला आहे. तसेच याबाबत त्यांनी पुरवणी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे. 
कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक अडकवले आणि अटक केली, असेही यात म्हटले आहे.

------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

mumbai marathi news fake TRP issue There is no evidence against Arnab Goswami


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai marathi news fake TRP issue There is no evidence against Arnab Goswami