भिवंडीतील डम्पिंग ग्राउंडला भीषण आग; आगीत कचरा विघटन करणारी यंत्रणा खाक

शरद भसाळे
Sunday, 24 January 2021

भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील चाविंद्रा राम नगर येथील 
महानगर पालिकेच्या डम्पिंग ग्राऊंड वरील कचऱ्याला आज सकाळी अचानक भीषण आग लागण्याची घटना घडली

भिवंडी  - भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील चाविंद्रा राम नगर येथील 
महानगर पालिकेच्या डम्पिंग ग्राऊंड वरील कचऱ्याला आज सकाळी अचानक भीषण आग लागण्याची घटना घडली असून या आगीत कचरा डेपो वर कचरा विघटन साठी लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आलेली बायोमायनिंग मशीन जळून खाक झाली आहे

या आगीची माहिती कळताच भिवंडी अग्निशामक दलाचा जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग दोन तासात शांत केली. सदर आग कशा मुळे लागली याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.  भिवंडी महानगर पालिकेच्यावतीने शहरातील शांतीनगर परिसरातील चाविंद्रा राम नगर व गायत्रीनगर यानागरी वस्ती लगत असलेल्या आरक्षित जागेवर डम्पिंग ग्राऊंड  सुरू केले आहे.शहरातील विविध भागात साचणार कचरा गोळा करून दररोज या ठिकाणी डंप करण्यात येत आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

मात्र महापालिकेचा आरोग्य विभागाच्यावतीने या कचऱ्या वर  नियमित जंतुनाशक औषध फवारणी करणे आवश्यक आहे मात्र त्यामध्ये कसुर होत असल्याने नागरी वस्तीत राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात कचरा दुर्गंधी चा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे डंपर ग्राऊंड बंद करण्यात यावे अशी मागणी होत आहे.असे असतानाच आज सकाळी डम्पिंग ग्राऊंड वरील कचऱ्याला अचानक भिषण आग त्यामुळे कचरा डंप करण्यासाठी आलेल्या कामगारांची धावपळ उडाली या आगीने रौद्र रूप धारण केल्याने नागरिकांनी अग्निशामक दलाचा जवानांना माहिती देताच त्यांनी घटनास्थळी  धाव घेऊन आग विजवण्यासाठी केमिकल मिश्रित पाण्याचा मारा करून आग शांत केली मात्र या आगीत लाखो रुपये किमंतीची पालिकेची यंत्रसामुग्री आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झाली आहे.

दरम्यान या आगी मुळे सर्वत्र धूर पसरला असल्याने या परिसरातील नागरी वस्तीतील नागरीकांना धुरा सोबत दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागला त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

mumbai marathi news fire at dumping ground in Bhiwandi Destroy waste waste decomposition system

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai marathi news fire at dumping ground in Bhiwandi Destroy waste waste decomposition system