
गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत 2020 मध्ये झालेल्या अपघातांतील मृत्यूदरात घट झाली झाल्याचे महामार्ग पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीतून हे स्पष्ट झाले आहे.
मुंबई - द्रुतगती मार्ग, महामार्ग तसेच राज्यमार्गांवर वेगमर्यादेचे उल्लंघन करून बेदरकारपणे वाहन चालवल्याने अपघात घडत आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत गेल्या वर्षी अपघातांच्या आकडेवारीत घट झाली आहे. 2020 मध्ये राज्यात 25 हजार 456 अपघात घडले. यात 11, 452 जणांचा मृत्यू झाला. 2017 ते 2019 या तीन वर्षांच्या तुलनेत 2020 मध्ये झालेल्या अपघातांतील मृत्यूदरात 10 टक्क्यांनी घट झाली आहे. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीतून हे स्पष्ट झाले आहे.
रस्त्यांवरील अपघात रोखण्यासाठी जिल्हास्तरावर रस्ता सुरक्षा समितींची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यातून जाणारा महामार्ग आणि राज्यमार्गावरील अपघात प्रवण क्षेत्रे शोधून काढण्याची जबाबदारी या समितींवर सोपविण्यात आली आहे. याशिवाय वाहतूक पोलीस विभागांकडून वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक आणि हेल्मेटचा वापर न करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्याच वेळी चारचाकी वाहन चालक आसनपट्टा (सीटबेल्ट) वापरण्याचे प्रमाण वाढल्याचे रस्ता सुरक्षा अभियानात आढळले.
मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
अपघातात गंभीर जखमी झालेल्यांमध्ये 25 टक्के आणि त्यातील गंभीर जखमींच्या संख्येत 27 टक्क्यांनी घट झाली आहे. किरकोळ अपघातांमध्ये 33 टक्के आणि त्यात किरकोळ जखमींच्या संख्येत 41 टक्क्यांनी घट झाली आहे. एकूण अपघातांत 23 टक्क्यांनी घट झाल्याची माहिती परिवहन विभागाने दिली.
वर्ष | एकूण अपघात | एकूण मृत्यू |
2017 | 36056 | 12511 |
2018 | 35717 | 13261 |
2019 | 32925 | 12788 |
2020 | 25456 | 11452 |
mumbai marathi news A large reduction in the number of accidental deaths in the state In front of highway police statistics
------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )