'वीजबिल सवलतीबाबत ऊर्जामंत्र्यांनी लोकांची फसवणूक केली'; मनसेची थेट पोलिसांत तक्रार

रजनीकांत साळवी
Tuesday, 26 January 2021

वाढीव वीज बिलात नगरिकांना सवलत देण्यात येईल अशा आश्वासनांची पूर्तता न केल्याबाबत ऊर्जा मंत्री यांच्यासह ऊर्जा सचिव व बेस्ट महाव्यवस्थापक यांच्यावर आर्थिक फसवणुकीची तक्रार मनसेने शिवाजीपार्क पोलिस ठाण्यात केली.

मुंबई :- वाढीव वीज बिलात नगरिकांना सवलत देण्यात येईल अशा आश्वासनांची पूर्तता न केल्याबाबत ऊर्जा मंत्री यांच्यासह ऊर्जा सचिव व बेस्ट महाव्यवस्थापक यांच्यावर आर्थिक फसवणुकीची तक्रार मनसेने शिवाजीपार्क पोलिस ठाण्यात केली.  वाढीव वीज बिलाबाबत याआधीही मनसेने पोस्टकार्ड आंदोलन केले होते आता पुन्हा एकदा हाच मुद्दा घेत मनसे आक्रमक झाली आहे.

मनसेचे माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजीपार्क पोलिस ठाण्यात भेट देत शिवाजीपार्क पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना तक्रार दाखल करून घेण्यासाठी निवेदन सादर केले. कोरोंना महामारीच्या दिवसांत टाळेबंदी असताना महावितरणाकडून वीज मीटर रिडिंगसाठी प्रतिनिधी पाठविण्यात आले नाही या काळात ग्राहकांना वीज वापरांपेक्षा अतिरिक्त जादा बिल बेस्ट कडून पाठविण्यात आले होते. लॉकडाउनमुळे उत्पन्नाचे स्त्रोत बंद असताना वाढीव वीज बिल पाहून ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे वाढीव बिलांबाबत तक्रारी मांडल्या होत्या तसेच बैठकी देखील घेण्यात आल्या या बैठकीत वीज बिलात कपात करून नगरिकांची दिवाळी गोड करू असे आश्वासन देण्यात आले होते असे यशवंत किल्लेदार यांनी सांगितले.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

सातत्याने याचा पाठपुरावा करूनही दिवाळी नंतर ऊर्जा मंत्र्यांनी घुमजाव केले वीज बिलात सवलत न देता मीटर रीडिंग नुसार बिल भरावेच लागेल असे सांगण्यात आले त्यामुळे नागरिकांची एकप्रकारे आर्थिक फसवणूक केली यासाठी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असल्याचे किल्लेदार यांनी सांगितले.

mumbai marathi news Maharashtra navnirman sena police complaint against energy minister nitin raut

-------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai marathi news Maharashtra navnirman sena police complaint against energy minister nitin raut