संजय राऊत यांचीही 'पद्मश्री'साठी शिफारस? पण घडलं असं की...

तुषार सोनवणे
Tuesday, 26 January 2021

महाविकासआघाडीकडून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नावाचीही शिफारस करण्यात आली होती.

मुंबई - देशातील प्रतिष्ठेच्या नागरी पुरस्कार म्हणजेच पद्म पुरस्कार ( Padm awards 2021 ) जाहीर झाले आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून तब्बल 98 मान्यवरांची यादी केंद्र सरकारला पाठवण्यात आली होती. यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नावाचीही शिफारस करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्र सरकारने 2021चे पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत. 119 मान्यवरांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांसाठी महाविकास आघाडी सरकारकडून 98 नावांची यादी पाठवण्यात आली होती. यातील एका नावाव्यतिरिक्त सर्व नावांवर केंद्र सरकारने फूली मारली आहे. महाविकास आघाडीने शिफारस केलेल्या नावांपैकी फक्त सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. एका वृत्तपत्राने याविषयी बातमी दिली आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

महाविकास आघाडीकडून शिफारस करण्यात आलेल्या नावांमध्ये 'पद्मविभूषण' पुरस्कारासाठी मुकेश अंबानी, सुनील गावस्कर .यांच्या नावाची शिफारस केली होती. तसंच पद्मभूषण पुरस्कारासाठी सिंधूताई सपकाळ, उद्योजक आदर पुनावाला, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेते मोहन आगाशे, स्कायडाव्हर शीतल महाजन, कै. राजारामबापू व डॉ. मिलिंद कीर्तने या मान्यवरांची शिफारस करण्यात आली होती. परंतू सिंधूताई यांना पद्मभूषणऐवजी पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला.

महाविकास आघाडीने 'पद्मश्री' पुरस्कारासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, यशवंत गडाख, डॉ. जगन्नाथ दीक्षित, पत्रकार मधुकर भावे यांच्यासह 88 नावांची शिफारस करण्यात आली होती. परंतु या नावांचा पुरस्कारासाठी केंद्राने विचार केला नसल्याची माहिती समोर आली आहे.

mumbai marathi news Sanjay Raut was recommended for the Padma Shri But the central government rejected it

-------------------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai marathi news Sanjay Raut was recommended for the Padma Shri But the central government rejected it