esakal | School Reopen | महापौरांची पालकांसोबत चर्चा, ८वी ते १२वीचे वर्ग सुरू होणार?
sakal

बोलून बातमी शोधा

Kishori-Pednekar

महापौरांची पालकांसोबत चर्चा, ८वी ते १२वीचे वर्ग सुरू होणार

sakal_logo
By
ओमकार वाबळे

येत्या ४ ऑक्टोबरपासून राज्यभरात शाळा सुरू होणार आहेत. आठवी ते बारावीचे वर्ग भरवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र पालकांमध्ये अद्याप संभ्रमाचे वातावरण आहे. काही पालक अद्याप मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नाहीत.

नुकतेच केईएम मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएसचे शिक्षण घेणारे विद्यार्थी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पालकांनी संमती दिली तरच विद्यार्थ्यांना शाळेत घेतले जाईल, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालकांसोबत चर्चा करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मुंबईतील शाळा उघडण्यावर सरकार ठाम असून कोरोनाचे सर्व नियम पाळून शिक्षण पार पडणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

loading image
go to top