आज रविवार!  मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

आज रविवार!  मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरी भागांवर देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी आज मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला फलाट क्रमांक 8 वरून विशेष सेवा चालविल्या जाणार आहे. तर ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेमार्गे जाण्याची परवानगी देण्यात आल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे.

कुठे
मुलुंड-माटुंगा अप आणि डाउन जलद मार्गांवर

कधी
सकाळी 9.20 ते दुपारी 2.20 पर्यंत

परिणाम
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 8.52 ते दुपारी 1.53 पर्यंत सुटणाऱ्या जलद सेवा माटुंगा येथे डाउन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील.  या गाड्या शीव ते मुलुंड स्थानकांवरील सर्व स्थानकांवर थांबतील आणि नियोजित वेळापत्रकापेक्षा 15 मिनिटे उशिराने नियोजित स्थानकावर पोहचतील. जलद मार्गावरील गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील.  ठाणे येथून सकाळी 8.55 ते दुपारी 2.13 या वेळेत  सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि मुलुंड ते दादर स्थानकांवरील सर्व स्थानकांवर थांबतील.  परळ येथे या गाड्या अप जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील आणि नियोजित वेळापत्रकानंतर 15 मिनिटे उशिराने पोहोचतील. 

कुठे

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी,वांद्रे डाउन हार्बर मार्गावर आणि चुनाभट्टी/वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर

कधी
सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 दरम्यान आणि
सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत

 
परिणाम
छत्रपती शिवाजी महाराज  टर्मिनस मुंबई येथून सकाळी 11.34 ते दुपारी 4.47 पर्यंत वाशी / बेलापूर / पनवेलसाठी डाउन हार्बर मार्गावरील सेवा व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.56 ते दुपारी 4.43 पर्यंत वांद्रे / गोरेगाव  करिता सुटणा-या डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. आणि  पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 या वेळेत  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटण्या-या आणि गोरेगाव / वांद्रे येथून  सकाळी 10.45 ते दुपारी 4.58 या वेळेत  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटण्या-या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

कुठे
चर्चगेट ते मुंबई सेंट्रल रेल्वे मार्गावरील अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी
सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत

परिणाम 
ब्लॉक दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सर्व गाड्यांना चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकादरम्यान जलद मार्गावर चालवण्यात येणार आहे. त्यासोबतच अप आणि डाऊन मार्गावरील काही उपनगरीय गाड्या रद्द सुद्धा करण्यात येणार आहे.

---------------------------

(संपादन- पूजा विचारे)

mumbai mega block December 6 central and western railway check details

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com