मुंबईसाठी 'नो वॉर्निंग' ; उन्हाचे चटके मात्र वाढले

 sun
sunsakal media

मुंबई : मुंबई हवामान केंद्राने राज्यभरातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा (Rainfall alert) दिला आहे. मुंबईतील पावसाचे संकट मात्र टळले आहे. हवामान विभागाकडून मुंबईत दोन दिवसांसाठी ‘नो वॉर्निंग’ (No warning) जारी करण्यात आली आहे. कोकणासह मध्य आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला होता. काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणही बघायला मिळाले. मुंबईत मात्र आज लख्ख ऊन (summer in mumbai) पडले होते. मुंबईवरील अवकाळी पावसाचे संकट टळले आहे.

 sun
खालापूर : भांडणाऱ्या दोघांना समज देण्याचा प्रयत्न; पोलिसाच्या डोक्यात मारला दगड

मुंबई हवामान विभागाने कोकण आणि उत्तर महाराष्ट्रासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ३०-४० किमी प्रतितास वेगाने येणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि नगर जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यासह धुळे, नंदुरबार, पुणे, कोल्हापूर, बीड, परभणी, बुलडाणा, अकोला, वाशीम, हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घराबाहेर पडताना खबरदारी घ्या, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

मुंबईतील कमाल तापमान ३७ अंशांवर

राज्यभरातील अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असताना मुंबईतील कमाल तापमानात मात्र वाढ झाली. बुधवारी सांताक्रूझमध्ये ३७.५ आणि कुलाब्यात ३४.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. कमाल तापमानात पुन्हा एकदा ३ ते ४ अंश सेल्सिअस वाढ झाली आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कमाल तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com