Mumbai Metro News : सहा मेट्रोमार्गांसाठी ७३ टक्के खांब उभारणी पूर्ण

Mumbai Metro News
Mumbai Metro News

मुंबई : मुंबई महानगरात मेट्रोचे जाळे उभारून सार्वजनिक मुंबईकरांसाठी प्रभावी वाहतूक सेवा उभारण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून मेट्रो प्रकल्पांचे काम सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर निर्माणाधिन असलेल्या मेट्रो प्रकल्पांमध्ये ३६०३ खांब उभारले आहेत.

Mumbai Metro News
Hingoli News : हंगामापूर्वीच उडीद, मूग हातचे जाणार? येत्या तीन-चार दिवसांतच करावी लागणार पेरणी

मेट्रो मार्गिका ठराविक वेळेत पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीएची टीम प्रयत्नशील आहे. ६ मुंबई मेट्रो मार्गांसाठी एकूण ४९२९ मेट्रोचे खांब उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी जवळपास ७३ टक्के खांबांची उभारणी आता यशस्वीरीत्या पूर्ण झाली असल्याची माहिती एमएमआरडीएने दिली आहे.

मुंबईसारख्या गजबजलेल्या मार्गांवर पूर्वनिर्मित घटक वेगवेगळ्या कास्टिंग यार्ड्सवर तयार करून बांधकाम स्थानावर नेले जातात. ३५० ते ५०० मेट्रिक टन क्षमतेसह क्रेन वापरून उभारले जातात. त्यामुळे महामार्गावरील तसेच सार्वजनिक वाहतुकीतील व्यत्यय कमी करून सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी मेट्रोचे बहुतांश बांधकाम रात्रीच्या वेळी करण्यात येते, असल्याची माहिती एमएमआरडीएने दिली.

Mumbai Metro News
Pankaja Munde: पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर? नाना पटोलेंच्या विधानामुळं चर्चांना उधाण

निर्माणाधीन प्रकल्प आणि खांबांच्या उभारणीची सद्यस्थिती

• मेट्रो मार्ग २ब (DN नगर ते मंडाले):

भौतिक प्रगती : ५०.७%

पूर्ण झालेले खांब: ११०९ पैकी ६१४

• मेट्रो मार्ग ४ (वडाळा ते कासार वडवली):

भौतिक प्रगती: ५५%

पूर्ण झालेले खांब: १४७६ पैकी ९७३

• मेट्रो मार्ग ४अ (कासारवडवली - गायमुख)

भौतिक प्रगती: ५८.०८

पूर्ण झालेले खांब: २२१ पैकी १४३

• मेट्रो मार्ग ५ टप्पा १ (ठाणे ते भिवंडी):

भौतिक प्रगती: ७८.४%

पूर्ण झालेले खांब : ४६४ पैकी ४४०

• मेट्रो मार्ग ६ (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी):

भौतिक प्रगती: ७०.७५ %

पूर्ण झालेले खांब: ७६९पैकी ६५७

•मेट्रो मार्ग ९ (दहिसर ते मीरा भाईंदर):

भौतिक प्रगती : ६१.२८%

पूर्ण झालेले खांब : ९०० पैकी ७७६

"उपनगरीय रेल्वे आणि बस सेवा यांच्यावरील ताण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे एमएमआरडीए मुंबई महानगर प्रदेशातील सर्व मेट्रो कॉरिडॉर शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यास प्राधान्य देत आहे. नुकतेच उद्घाटन झालेले मेट्रो मार्ग २अ आणि ७ हे मार्ग लाखो प्रवाशांना दिलासा देत आहेत. एमएमआरडीए सध्या गायमुख ते शिवाजी चौक (मिरा रोड) दरम्यान मेट्रो मार्ग १० साठी विविध परवानग्या मिळविण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. याव्यतिरिक्त, मेट्रो मार्ग १२ (कल्याण तळोजा) साठी सामान्य सल्लागार नियुक्त करण्यात आला आहे आणि स्थापत्य कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे.

- डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com