उद्धव ठाकरेंचा मास्टरस्ट्रोक ? मोदींच्या बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठीच्या प्रास्तवित जागेवर उभारलं जाणार मेट्रो कारशेड?

उद्धव ठाकरेंचा मास्टरस्ट्रोक ? मोदींच्या बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठीच्या प्रास्तवित जागेवर उभारलं जाणार मेट्रो कारशेड?

मुंबई : मुंबई मेट्रो ३ चं कारशेड कांजूरमार्गच्या जागेवर उभारण्याच्या कामाला मुंबई उच्च न्यायालयाने 'स्टे ऑर्डर' दिली आहे. यामुळे मुंबई मेट्रो ३ कारशेडचा न्यायालयीन वाद आता दीर्घकाळ चिघळण्याची शक्यता आहे. अशात मुंबईकरांच्या सेवेत नियोजित वेळेनुसार मेट्रो तीन दाखल व्हावी म्हणून सरकारकडून काही महत्त्वाची पावलं उचलली जातायत. यासाठी सरकारने आता मुंबईतील इतर महत्त्वाच्या जागांची मेट्रो तीनच्या कारशेडसाठी चाचपणी सुरु केली आहे. यामध्ये मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर मेट्रो ३ चं कारशेड उभारता येऊ शकतं का याबद्दल सरकार विचाराधीन असल्याचं समजतंय.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांजूरमार्गमधील जागेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आपला निर्णय दिल्यानंतर आज एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. यामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत मुंबई मेट्रो ३ च्या कारशेडचं काम तात्पुरतं मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील बुलेटसाठीच्या प्रस्तावित जागेवर हलवलं जाऊ शकतं का याची चाचपणी केली जातेय. वांद्रे कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीची प्रस्तावित जागा राज्य सरकारच्या मालकीची आहे. त्यामुळे हा पर्याय योग्य ठरू शकतो का हे सरकारकडून पडताळलं जात आहे.    

मुंबई मेट्रो तीन कारशेडच्या जागेवरून भाजप आणि महाविकास आघाडीत राजकारण रंगताना पाहायला मिळालं आहे. अशात बुलेट ट्रेन हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट. मात्र बुलेटसाठीची प्रस्तावित जागा राज्य सरकारच्या अखत्यारीतील असल्याने आता ती जागा केंद्राला दिली जावी की मेट्रो तीनच्या कारशेडसाठी वापरली जावी याबाबत विचार सुरु असल्याने पुन्हा एकदा केंद्र विरद्ध राज्य असा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

mumbai metro three project proposed land for bullet train crashed at bandra kurla complex 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com