Mumbai Metro: अंधेरी ते दहिसर होणार अर्ध्या तासात प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Metro: अंधेरी ते दहिसर होणार अर्ध्या तासात प्रवास

'मुंबई मेट्रो'च्या ट्रायल रनला मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा कंदील

Mumbai Metro: अंधेरी ते दहिसर होणार अर्ध्या तासात प्रवास

मुंबई: मुंबई मेट्रोच्या (Mumbai Metro) 2A आणि लाईन 7 या मार्गावरील ट्रेन सेवा जानेवारी २०२२ पासून सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) महत्त्वाच्या नेत्यांच्या हजेरीत या मेट्रोची ट्रायल रन (Trial Run) सुरुवात झाली. आकुर्ली (Aakurli) येथील मेट्रो स्टेशनवर उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, मुंबईचे पालकमंत्री असलम शेख आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी हिरवा झेंडा (Green Signal) दाखवल्यानंतर ही ट्रायल रन सुरू झाली. (Mumbai Metro Trial Run started after CM Uddhav Thackeray MVA Govt Leaders Show Green Signal)

MMRDAने दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोच्या पहिल्या फेसमधील 2A आणि लाईन 7 या दोन मार्गावरील ट्रायल रनला आज सुरूवात झाली. 2A ही लाईनवर मेट्रो दहीसर ते डीएन नगर या मार्गावर तर 7A लाईनवरील मेट्रो दहीसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मार्गावर धावेल. या दोन्ही मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झालं आहे.

मुंबई मेट्रोबद्दल काही म्हत्त्वाचे-

ट्रायल रन आकुर्ली ते डहाणूकरवाडीपर्यंत

मुंबईकरांना सर्वात मोठा दिलासा

वेस्टर्न एक्प्रेस हायवे वरुन २० ते २५ टक्के वाहतूक कोंडी कमी होईल

अर्ध्या तसात अंधेरीने दहीसरला पोहोचू शकणार

लोकलमधील गर्दी १० टक्क्याने कमी होऊ शकतो

फेज २ सुरु व्हायला काही काळ लागेल

कोरोना संकटकाळात काम पूर्म करण आव्हानात्मक

ऑगस्टपर्यंत मुंबईकरांसाठी पूर्णपणे ड्रायव्हरलेस मेट्रो

टॅग्स :mumbai metro