रुळांवर चालला खराखुरा ट्रक; मुंबईकरांच्या मेट्रोसाठी काहीपण 

रुळांवर चालला खराखुरा ट्रक; मुंबईकरांच्या मेट्रोसाठी काहीपण 

Published on

मुंबई, ता. 15 :  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मेट्रो-2 अ आणि मेट्रो- 7 चे काम सुरु आहे. या मार्गवरील कोच मुंबईत दाखल झाले आहेत. तर, आता मेट्रो 2 अ मार्गावरील तांत्रिक कामे केली जात आहेत. या मार्गाच्या ओव्हरहेड वायरिंगचे काम करण्यात येत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने या दोन्ही मार्गावरील मेट्रोच्या चाचण्या मार्च-एप्रिलमध्ये सुरू करण्याचा दावा केला आहे. 

मेट्रो 2 अ दहिसर पूर्व ते डीएन नगर यादरम्यान ओव्हरहेड वायरिंगचे काम सुरू आहे. हा एकूण मार्ग 18.5 किमी लांबीचा आहे. या मार्गावर तांत्रिक कामे करण्यासाठी ट्रक चालविला जात आहे. ट्रकद्वारे मेट्रोच्या वायरिंगचे काम केले जात आहे. तर, मेट्रो 7 अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या दरम्यान तांत्रिक कामे सुरू आहेत. हा संपूर्ण मार्ग 16 किमी लांबीचा आहे. या दोन्ही मेट्रो मार्गावर नियंत्रण ठेवणे आणि एकात्मिक कृतींसाठी चारकोप आगार विकसित केले आहे.

मेट्रो चाचणी मार्चपासून सुरू होईल. ती पुढे महिनाभर सुरू राहील. त्यानंतर मेपासून मेट्रो मार्गाचे व्यावसायिक कामकाज सुरू होईल. त्यामुळे मार्च-एप्रिलमध्ये मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 या दोन्ही मेट्रो मे किंवा जुन महिन्यात प्रवाशांसाठी खुली होणार आहे. 

लोकल आणि रस्ते यावरील वर्दळ कमी करण्यासाठी मेट्रोचे दोन्ही प्रकल्प महत्वपूर्ण आहेत. त्यामुळे या प्रकल्पाची कामे वेगात सुरू आहेत. अंधेरी ते दहिसर येथील प्रवाशांना प्रवास करण्यासाठी रस्ते मार्ग, लोहमार्ग यासह मेट्रोचा पर्याय उपलब्ध झाला आहे.  

mumbai metro work overhead wires installed through truck


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com