मुंबई : स्थलांतरित पक्ष्यांनी रान बहरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई : स्थलांतरित पक्ष्यांनी रान बहरले

मुंबई : स्थलांतरित पक्ष्यांनी रान बहरले

मुंबई : रायगड जिल्हा हा ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीतील गुलाबी थंडीमुळे स्थलांतरित पक्ष्यांसाठी नंदनवन ठरतो. यंदाही त्याची प्रचिती येतेय. सध्या सुमारे १२८ प्रजातींच्या परदेशी पाहुण्यांचे आगमन जिल्ह्यात झाले असून त्यांच्या मंजुळ आवाजामुळे वने संपन्न झाली आहेत. देशभरातील पक्षिप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी ठरलेली दिसते.

हवामानातील बदलामुळे स्थानिक अधिवास असणाऱ्या ठिकाणी पक्ष्यांना खाद्याची कमतरता भासू लागते. उपासमारीमुळे त्यांचे अस्तित्वही धोक्यात येते. याची पूर्वकल्पना असल्याने अनेक पक्षी स्थलांतराचा मार्ग शोधू लागतात. रायगड जिल्ह्यामध्येही दर वर्षी ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीमध्ये स्थलांतरित पक्ष्यांची वर्दळ वाढते. आपल्या मूळ अधिवासापासून काही पक्षी तर तब्बल ३० हजार किलोमीटरचा प्रवास करतात. जिल्ह्यातील समुद्रकिनारी समुद्री पक्ष्यांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसतो; तर जंगल भागांमध्ये शिकारी पक्ष्यांची हजेरी लक्षवेधी असते. ४० ते ६० प्रकारचे समुद्र पक्षी, चार प्रकारचे ससाणे, आठ प्रकारचे गरुड, तर तब्बल २८ प्रकारची बदके असे सुमारे १२८ जातीचे पक्षी जिल्ह्यात स्थलांतरित झालेल्या आहेत.

उरणमध्येही परदेशी पक्ष्यांचे थवे

उरण परिसरातील विस्तीर्ण जलाशय, पाणथळ क्षेत्र, खाडी किनाऱ्यावरही विविध स्थलांतरित परदेशी पक्ष्यांची गर्दी वाढली आहे. या आकर्षक पक्ष्यांमध्ये अग्निपंखी, पेलिकन, करकोचा, सीगल यांच्यासोबतच काही दुर्मिळ पक्ष्यांचाही समावेश आहे.

हेही वाचा: संसदेपर्यंत ट्रॅक्टर मार्च निघणारच; अजून मागण्या बाकी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं

उरण परिसरातील पाणजे पाणथळ क्षेत्रात ३०० हेक्टर जागेत भरतीच्या पाण्याला अटकाव करणारे पाच मार्ग खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या तेथे पक्ष्यांचे आवडते खाद्य खुबे, शेवाळ, कीटक, कृमी मोठ्या प्रमाणात असल्याने हा परिसर सध्या पक्ष्यांनी गजबजून गेला आहे. यासोबतच डोंगरी, बेलपाडा, दास्तान फाटा, रांजणपाडा, जसखार, बोकडवीरा-बीपीसीएल, नवीन शेवा आदी परिसरातील खाड्या, पाणथळी जागासागरी किनारेही पक्ष्यांनी फुलले आहेत.

loading image
go to top