मुंबई: 'बर्थ डे सेलिब्रेशन' आमदाराला सोशल डिस्टन्सिंगचा विसर

नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा
रईस शेख
रईस शेख

मुंबई: दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई मेट्रोचं उद्घटन झालं. यावेळी अनेकांना कोरोनाबद्दलचे नियम, सोशल डिस्टन्सिंगचा विसर (social distancing rule) पडल्याचे दिसून आलं होतं. ते फोटोही व्हायरल झाले होते. आता समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख (Rais Shaikh) यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातही असाच प्रकार घडला आहे. (Mumbai mla Rais Shaikh birthday celebration social distancing rule break)

खरंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींकडून जास्त अपेक्षा आहेत. सातत्याने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं जातयं. पण आमदार रईस शेख यांना याचा विसर पडला. रईस शेख यांनी कार्यकर्त्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर वायरल झाला आहे.

रईस शेख
लोकलमध्ये मोबाइल चोराला पकडण्याच्या झटापटीत तिचं आयुष्य संपलं

या व्हिडिओत कार्यकर्त्यांच्या गर्दीत आमदार रईस शेख आणि त्याचे स्विय सहाय्यक फरदीन खान आणि 20 ते 30 कार्यकर्ते शेख यांचा वाढ दिवस साजरा करताना दिसत आहेत. याची गंभीर दखल नागपाडा पोलिसांनी घेतली.

रईस शेख
मनसुख प्रकरणात वोल्क्सवॅगन कारच कनेक्शन, मानेशी काय संबंध?

आमदार रईस शेख आणि त्याचे स्विय सहाय्यक फरदीन खान आणि 20 ते 30 कार्यकर्त्यांवर कोरोना नियमांचे तसेच मुंबई पोलिसांच्या कलम 144 जमावबंदीचे उल्लघंन केल्याच्या आरोपाखाली नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com