cruise
cruise esakal

Mumbai : मुंबईमधून लवकरच दोन क्रूझ सेवांना सुरुवात

मुंबईहून गोवा, लक्षद्वीपला जाता येणार; उन्हाळ्यात सुरू होण्याची शक्यता

मुंबई : कार्डिलीयानंतर मुंबई ते गोवा आणि मुंबई ते लक्षद्वीप या मार्गावर आणखी दोन भव्य प्रीमियम लक्झरी क्रूझ सेवा लवकरच सुरू होणार आहेत. यासंदर्भात मुंबई पोर्ट ॲथॉरिटी आणि आंतरराष्ट्रीय क्रूझ सेवा देणाऱ्या कंपनीबरोबर बैठक पार पडली. अनुमती मिळाल्यानंतर या दोन क्रूझ उन्हाळ्यात दाखल होणार असल्याची माहिती मुंबई पोर्ट ॲथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला दिली.

गेल्या वर्षी मुंबईत देशातील पहिली आंतरराष्ट्रीय क्रूझ परिषद पार पडली होती. यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रूझ सेवा देणाऱ्या कंपन्यांनी भारतात क्रूझ सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार आता मुंबई ते गोवा आणि मुंबई ते लक्षद्वीप या मार्गावर आणखी दोन लक्झरी क्रूझ सुरू करण्याच्या हालचालींचा वेग वाढला आहे. नुकतेच मुंबई पोर्ट ॲथॉरिटी आणि आंतरराष्ट्रीय क्रूझ सेवा देणाऱ्या दोन कंपन्यांनी मुंबई ते गोवा आणि मुंबई ते लक्षद्वीप या मार्गावर क्रूझ चालवण्याची अनुमती मागितली आहे.

मुंबई पोर्ट ॲथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले, की मुंबईत आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनस युद्ध पातळीवर उभारण्यात येत असून जुलै २०२४ पर्यंत हे टर्मिनल प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. सध्या ४० टक्के क्रूझ टर्मिनसचे काम झाले आहे; परंतु आतापासून देशांतर्गत क्रूझ सेवा सुरू करण्यासंदर्भात अनेक आंतरराष्ट्रीय क्रूझ सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून विचारण्यात येत आहे. सध्या मुंबईतील क्रूझ टर्मिनसवरून मुंबई ते गोवा कार्डिलिया क्रूझ सुरू आहे. आणखी दोन क्रूझ मुंबई ते गोवा आणि मुंबई ते लक्षद्वीपदरम्यान सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. यासंदर्भात क्रूझ सेवा देणाऱ्या कंपनीबरोबर बैठक पार पडली आहे.

अशी आहे भव्य कार्डिलिया क्रूझ!

सध्या मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिसवरून मुंबई ते गोवा, मुंबई ते लक्षद्वीप आणि मुंबई ते कोचीदरम्यान कार्डिलिया क्रूझची सेवा सुरू आहे. पर्यटकांचा प्रतिसादसुद्धा चांगला मिळतो आहे. एकूण ११ पॅसेंजर डेक आणि ७९६ केबिन्स असलेल्या या भव्य कार्डिलिया क्रूझमध्ये एकाच वेळी १ हजार ८४० हून अधिक पाहुण्यांना सामावून घेण्याची क्षमता आहे. कार्डिलिया क्रूझचे तिकीट २२ हजारांपासून ५६ हजारांपर्यंत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com