गेल्या १० वर्षात मुंबई महानगरपालिकेच्या ११० शाळांना टाळं

४७ हजार विद्यार्थ्यांवर शाळा सोडण्याची वेळ
 Mumbai Municipal Corporation schools
Mumbai Municipal Corporation schoolssakal media

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळांच्या निमित्ताने एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये जवळपास ११० शाळा बंद झाल्याचा आकडा समोर आला आहे. गंभीर बाब म्हणजे या कालावधीत सुमारे ४७ हजार २०२ विद्यार्थ्यांवर शाळा सोडण्याची वेळ आली आहे. मराठी शाळा आणि विद्यार्थ्यांच्या संख्येत झालेली घट या मुद्द्यावर सत्ताधारी शिवसेनेच्या कारभारावर भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सर्वप्रथम आपणास हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाच्या उद्धारासाठी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या ५१ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. पण बाळासाहेबांच्या पश्चात महाराष्ट्राची मायबोली असलेल्या ‘मराठी’भाषेला आज उतरती कळा लागली आहे. खासकरून स्वत:ला मराठी रक्षक म्हणून घेणाऱ्या सत्ताधारी सेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या शाळांना टाळं ठोकण्यात येत आहे. 'रोज मरे त्याला कोण रडे?' हाच दृष्टीकोनातून सत्ताधारी सेनेचा मराठी शाळांबाबत आहे का? असा सवाल भाजपचे माजी नगरसेवक आणि मुंबई महानगरपालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.

वर्ष २०१२ - १३ मध्ये ३८५ मराठी शाळा होत्या. ८१ हजार १२६ विद्यार्थी होते. २०२१-२२ मध्ये शाळा फक्त २७२ उरल्यात आणि ३४,०१४ विद्यार्थ्यी तिथं शिक्षण घेतायेत. म्हणजेच गेल्या १० वर्षात ११० मराठी शाळांना टाळं लागलं आहे. ४७ हजार २०२ विद्यार्थ्यांवर शाळा सोडण्याची वेळ आल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे सत्ताधारी सेना मराठी अस्मितेच्या बाता करून सत्तेचा मेवा उपभोगत आहे आणि दुसऱ्या बाजूला मराठी शाळांची व विद्यार्थ्यांची संख्या ५० टक्क्यांनी घसरतीये असाही आरोप शिंदे यांनी केला आहे. तुम्ही मराठी शाळांच्या परिस्थितीची गंभीर दखल घ्याल जेणेकरून भविष्यात आपल्याला वर्धापन दिन हा “foundation day” म्हणून साजरा करण्याची वेळ येणार नाही, असाही टोला त्यांनी शिवसेनेला लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com