कंगनाची दोन कोटींची भरपाईची मागणी बोगस, महापालिकेने दाखल केलं प्रतिज्ञापत्र

सुनीता महामुणकर
Saturday, 19 September 2020

अभिनेत्री कंगना राणावतने केलेल्या दोन कोटी रुपयांची भरपाईची मागणी बोगस आणि आधारहीन असल्याचा दावा मुंबई महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयात केला आहे.

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतने केलेल्या दोन कोटी रुपयांची भरपाईची मागणी बोगस आणि आधारहीन असल्याचा दावा मुंबई महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयात केला आहे.

कंगनाचे पाली हिल येथील कार्यालयात असलेले कथित बेकायदेशीर बांधकाम महापालिकेने पाडले आहे. या कारवाई विरोधात तीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महापालिकेची कारवाई बेकायदेशीर असून कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले नसल्याचा दावा तीने केला आहे.तसेच महापालिकेकडून दोन कोटी रुपये नुकसान भरपाईची मागणी केली आहे

याला उत्तर म्हणून महापालिकेच्या वतीने प्रतिज्ञापत्र दाखल करून याला विरोध करण्यात आला आहे. महापालिकेची कारवाई नियमानुसार आहे. बंगल्यात नियमबाह्य काम सुरू होते आणि ते दडपून आता नुकसान भरपाईची मागणी केली आहे, असे महापालिकेने म्हटले आहे.

नियोजित आराखडा बदलून कंगनाने काम केले आहे. त्यामुळे पालिकेने चाळीस टक्के कारवाई केली आहे, असे म्हटले आहे. याचिकेवर 22 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. तूर्तास या कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Municipal Corporation has claimed in the Mumbai High Court that the demand of Rs two crore made by actress Kangana Ranaut is bogus