
उध्दव ठाकरेंसाठी मुंबई महापालिका म्हणजे नोटा छापण्याची मशीन: किरीट सोमय्या
मुंबई: मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली होती. (Yashwant Jadhav IT Raid) त्यानंतर आता आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या आणि परिवाराच्या ४१ मालमत्ता जप्त केल्या आहेत.
हेही वाचा: यशवंत जाधवांच्या ४१ मालमत्ता जप्त, IT कडून धडक कारवाई
याबाबत बोलताना आता किरीट सोमय्यांनी म्हटलंय की, यशंवत जाधवने एक हजार कोटीची मालमत्ता गोळा केली आहे. तेच पुरावे मी ईडीला, कंपनी मंत्रालयाला दिलेले आहेत. आज आयटीची कारवाई सुरु झाली आहे. त्यांच्या स्वताच्या नावावर ३७ प्रॉपर्टी आहेत. तर इतर ११ संपत्ती नातेवाईकांच्या नावावर आहेत.
महापालिका शिवसेनेसाठी एटीएम
उध्दव ठाकरे यांच्यासाठी महापालिका म्हणजे नोटा छापण्याची मशीन आहे. आपल्यासाठी एटीएम म्हणू, त्यांच्यासाठी ती रिझर्व्ह बँक आहे. नाटो छापण्याची मशीनच आहे. यशवंत जााधवांच्या घरातील व्यक्तीने सांगितलंय की, १० टक्के पैसे राहतात आणि बाकीचे ९० टक्के रक्कम मातोश्रीवर जाते.
हेही वाचा: नाना पटोले शरद पवारांच्या भेटीला, 'त्या' बैठकीनंतर राज्यात घडामोडींना वेग
ईडी आता होमवॉर्क करून जाते आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई अटळ आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसाठी महानगरपालिका ही पैसे कमावण्याचं साधन आहे. नाले सफाईच्या नावाखाली तिजोरी सफाई करतात. तुम भी लुटो हम भी लुटेंगे असं सुरुये. आदित्य ठाकरे, अनिल परब, चतुर्वेदी, पाटणकर यांच्या सगळ्यांच्या बेनामी मालमत्ता आहेत. सगळ्यांचे कमिशन ठरलेले आहे.
INS विक्रांत प्रकरणी म्हणतात...
पैसे कुठे जमा केले हे संजय राऊतांना माहिती आहे. त्यांनी आरोप लावले आहेत ना. ५८ कोटींचा आरोप त्यांनी केला आहे. विक्रांत बाबत ११ वर्षांनी ब्रह्म ज्ञान झाले का? आरोप त्यांनी केलेत, त्यामुळे त्यांना विचारा पुरावे काय आहेत? संजय राऊत आरोप करतात आणि पोलीस गुन्हा दाखल करतात. पोलीस काय विकले गेले आहेत का?
Web Title: Mumbai Municipal Corporation Is A Note Printing Machine For Uddhav Thackeray Kirit Somaiya
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..