Mumbai : हत्या प्रकरणात फरारी आरोपी 13 वर्षांच्या पोलीस तपासानंतर सांगलीतून अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Mumbai : हत्या प्रकरणात फरारी आरोपी 13 वर्षांच्या पोलीस तपासानंतर सांगलीतून अटकेत

मुंबई : मुंबईतून गेल्या 13 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात रफी अहमद किदवाई मार्ग पोलिसाना यश आले आहे. अटक आरोपीला दादर येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने घोषीत गुन्हेगार म्हणून घोषित केले होते. 47 वर्षीय संतोष कांबळे 13 वर्ष फरार झाल्यावर अखेर शनिवारी सांगलीतून आरएके मार्ग पोलिसांनी अटक केली.

वायरमन बनला गुन्हेगार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी संतोष कांबळे हे व्यवसायाने वायरमन होते. गुन्हा घडल्यानंतर त्यांनी वायरमनची नोकरी सोडली. राहण्याची अनेक ठिकाणे बदलली आणि पोलिसांच्या नजरेत येऊ नये म्हणून मोबाईल फोन मागील 13 वर्ष वापरला नाही. पोलिसांकडे त्याचा फोटोही नव्हता आणि त्याला लागलेल्या गोळीच्या जखमेच्या वळावरून आरोपीची ओळख पटवण्यात आले.

आरोपीकांबळेला सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील शेटपाळ गावातून अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2009 मध्ये आरोपी संतोष कांबळेला वडाळा मध्ये राहत असताना त्याच्या बहिणीच्या मालकावर मारहाण केली होती. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. आरोपीच्या बहिणीला ती ज्या ठिकाणी नोकरी करत होती तेथील मालकाने बहिणीला नोकरीवरून काढून टाकले होते. याचा राग म्हणून आरोपीने मारहाण केली होती. तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर आरोपी पळून परागंदा झाला होता. पोलिसाना कित्येक त्याचा शोध लागला नाही.

फरार म्हणून घोषित

सुरुवातील वडाळ्यातील जय शिवाजी नगर झोपडपट्टीत आरोपी राहायचा. परंतु झोपडपट्ट्या प्रशासनाकडून पाडण्यात आल्या, आरोपी संतोष कांबळे नंतर दुसऱ्या पत्त्यावर स्थलांतरित झाले. दादर येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने त्याच्याविरुद्ध अनेक वॉरंट जारी केले होते परंतु तो gairhaj राहील .शेवटी त्याला फरारी गुन्हेगार म्हणून कोर्टाने घोषित केले होते,”पोलीस त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होती पण त्याच्या मूळ ठिकाणाबद्दल कोणालाच माहिती नव्हती. त्याचा फोटो पोलिसांकडे नव्हता. त्याच्या उजव्या पायावर गोळी लागल्याचे खूण असल्याची एवढेच माहीती पोलिसांकडे होती. आरोपी संतोष कांबळे मोबाईल फोन वापरत नव्हता जेणेकरून पोलीस त्याला ट्रेस करू नये. त्याच्या जामिनाची मुदतही संपली होती,

अखेरीस तपासात यश

पोलिसांनी वर्षानुवर्ष तपास केल्यावर अखेरीस आरोपी सांगली जिल्ह्यातील शेटपाळ येथे असल्याची माहिती मिळवली, परंतु त्यांच्याबद्दल अधिक माहिती नव्हती. एका खबऱ्याने पोलिसाना माहिती दिली की कांबळे टूर्स अँड ट्रॅव्हल्स ऑपरेटरसोबत क्लिनर म्हणून काम करत होते. शेटपाल गावातील कोणीही त्यांच्यासोबत काम करत असेल तर त्यांना कळवण्याच्या सूचना देऊन पोलिसांनी सर्व टूर्स आणि ट्रॅव्हल्स चालकांचा शोध घेतला. अखेर 13 वर्षांचा शोध पूर्ण होत आरोपी अटक झाली