esakal | Mumbai: पावसात उद्यानाची भिंत पडून एकाचा मृत्यू एक गंभीर
sakal

बोलून बातमी शोधा

भिंत पडून एकाचा मृत्यू एक गंभीर

अंबरनाथ : पावसात उद्यानाची भिंत पडून एकाचा मृत्यू एक गंभीर

sakal_logo
By
श्रीकांत खाडे

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये नगरपालिकेच्या उद्यानाची भिंत कोसळून एक जण मृत्युमुखी पडला तर एक गंभीर असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसासह आलेल्या वादळी वाऱ्याने अंबरनाथला झोडपून काढले, त्याच वेळी  शहराच्या पूर्व भागातील महालक्ष्मीनगर, गॅस गोडाऊनसमोर असलेल्या उद्यानाची भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर असल्याचे सांगण्यात येते या दोघांचीही नाव रात्री  उशिरापर्यंत कळू शकली नव्हती.

शहराच्या पूर्व भागातील महालक्ष्मी नगर, गॅस गोडाऊन समोर नगर परिषदेच्या वतीने उद्यान तयार करण्यात आले होते. या उद्यानातील जमा झालेले पाणी बाहेर जाण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने या उद्यानाची भिंत कोसळून रस्त्याच्या पलिकडे असलेल्या काही घरांवर मोठे  दगड पडले. या दुर्घटनेत एकाचा  मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येते.     

हेही वाचा: यवतमाळ : दारव्हा, दिग्रस, पुसद भागातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

अपघातग्रस्त दोघेही पुरुष असून या दोघांतील मृताचे शव शवविच्छेदनासाठी तर जखमी असलेल्या व्यक्तीवर उपचार करण्यासाठी उल्हासनगर येथील सेंट्रल रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान पोहचले असुन परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. रात्री उशिरा जेसीबी मागवण्यात आला मात्र अरुंद रस्त्यामुळे जेसीबी घटनास्थळी पोहचण्यासाठी अडथळे असल्याने मदतकार्यात विलंब लागत आहे.

loading image
go to top