अभिनेत्री अवा मुखर्जी यांचे मुंबईत निधन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

मुंबई - "देवदास' चित्रपटात अभिनेता शाहरुख खानच्या आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री अवा मुखर्जी यांचे निधन झाले. त्या 88 वर्षांच्या होत्या. चित्रपटांसोबतच त्यांनी जाहिराती आणि छोट्या पडद्यावरही मोलाचे योगदान दिले.

अवा मुखर्जी यांनी 1966 मध्ये तारू मुखर्जी दिग्दर्शित "राम ढाका' या बंगाली चित्रपटातून अभिनयातील कारकिर्दीला सुरवात केली. त्यानंतर त्यांनी "स्निप', "डरना जरुरी है' या चित्रपटातही त्यांनी काम केले. संजय लीला भन्साळींच्या "देवदास' चित्रपटात त्यांनी शाहरुखच्या आजीची भूमिका साकारली होती. 2009 मध्ये अवा यांची मुलगी रोमिला मुखर्जी दिग्दर्शित "डिटेक्‍टिव नानी' या चित्रपटात त्यांची मुख्य भूमिका होती. याव्यतिरिक्त त्या उत्तम लेखिकाही होत्या. खऱ्या आयुष्यात त्यांनी कॉपी रायटर, अनुवादक म्हणूनही काम केले होते.

Web Title: mumbai news actress ava mukherjee death