राज्यपालांचा 'तो' प्रस्ताव रेटून नेण्याचा प्रयत्न फसला, युवासेनेच्या विरोधामुळे कुलगुरू झाले हतबल

राज्यपालांचा 'तो' प्रस्ताव रेटून नेण्याचा प्रयत्न फसला, युवासेनेच्या विरोधामुळे कुलगुरू झाले हतबल

मुंबई : मुंबई विद्यापीठात कामकाज सल्लागार म्हणून नेमण्यात यावे यासाठी केंद्रातील आयआयएफसीएल या कंपनीचा प्रस्ताव विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. सुहास पेडणेकर यांनी व्यवस्थापन परिषदेत आणला. मात्र युवा सेनेच्या विरोधापुढे हा प्रस्ताव अखेर संमत होऊ शकला नाही. यामुळे कुलगुरूंनी मागील काही दिवसांमध्ये हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठीची आखलेली रणनीती अपयशी ठरली असून युवा सेनेच्या सदस्यांना पुढे ते आज हतबल झाल्याचे चित्र व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत पहावयास मिळाले.

मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन व्यवस्थापन परिषदेची बैठक पार पडली.  या बैठकीला 18 पैकी 14 सदस्य उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीलाच राज्यपालांकडून शिफारस करण्यात आलेल्या केंद्रातील आयआयएफसीएल या कंपनीला मुंबई विद्यापीठाच्या कामकाजासंदर्भात कंत्राट देण्याविषयीचा प्रस्ताव कुलगुरूंनी आणला. तसेच ही कंपनी किती चांगल्या दर्जाची आहे, यासाठीचा एक डेमोही कुलगुरूंनी या बैठकीत प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र युवा सेनेच्या  प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर आदी सदस्यांनी याला कडाडून विरोध केल्यामुळे काही वेळ या बैठकीत खडाजंगी झाली. त्यामुळे कुलगुरूंना हा प्रस्ताव आम्ही रेटून नेऊ दिला नाही, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेतील युवासेना सदस्यांकडून देण्यात आली. 

कुलगुरूंनी केंद्रातील आयआयएफसीएल या कंपनीला कंत्राट मिळावे म्हणून हा प्रस्ताव प्रस्ताव मंजूर करण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. यासाठी त्यांनी 11फेब्रुवारी आणि आज झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव आणला होता. त्यासाठी त्यांनी आज रणनीतीही आखली होती. परंतु ती आम्ही वेळेत ओळखल्यानेहा प्रस्ताव अडवून ठेवला. त्यामुळे या विषयावर 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पुढील बैठकीत पुन्हा एकदा चर्चा होईल अशी माहिती सदस्यांकडून देण्यात आली.

थरकाप उडवणारी बातमी : पेटलेल्या अवस्थेत पीडितेने विजयला मारली मिठी, विक्षिप्त प्रेमाची भीषण कहाणी

कोणत्याही कंपनीला विद्यापीठाच्या कामकाजासंदर्भात महत्त्वाची जबाबदारी देताना त्यांच्याकडे तो अनुभव आहे का, हे लक्षात घेतले पाहिजे होते. परंतु कुलगुरूंनी केलेल्या प्रेझेंटेशनमध्ये या कंपनीकडे विद्यापीठाच्या कामकाजासंदर्भात कोणतेही कामकाज आम्हाला दिसले नाही. शिवाय ही कंपनी नेमका किती खर्च आकारणार आहे, हे सुद्धा गुपित होते. त्यामुळे आम्ही या प्रस्तावाला कडाडून विरोध केला आणि त्यामुळे कुलगुरूंना आपली भूमिका बदलावी लागली. त्यामुळे आता टेंडर प्रक्रिया केल्याशिवाय आम्ही असा निर्णय घेऊ देणार नाही असं राजन कोळंबेकर ( व्यवस्थापन परिषद सदस्य, मुंबई विद्यापीठ) म्हणालेत. 

mumbai news appointment of consultant in university of mumbai proposal rejected by committee  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com