
मुंबई,ता.5 : जागतिक तापमान वाढीवर शास्त्रीय उत्तर शोधण्यासाठी महानगर पालिका ‘क्लायमेट चेंज’ विभाग सुरु करणार आहे. पुढील आर्थिक वर्षापासून हा विभाग कार्यरत होणार आहे. सी 40 या जागतिक स्तरावरील चळवळीशी महानगर पालिका सलग्न झाली असून त्याअंतर्गत हा विभाग सुरु करण्यात येणार आहे.
पॅरीस पर्यावरण करारानुसार 2030 पर्यंत तामानात होणारी वाढ राेखण्यासाठी सी 40 ही चळवळ सुरु झाली आहे. भारतातील बंगळुरु, चेन्नई, कलकत्ता, जयपुर, दिल्ली ही शहरं या चळवळीत यापुर्वी सहभागी झाली आहेत. तसेच जगभरातील 97 शहरे या चळवळीशी जोडली गेली आहे. तापमान वाढ रोखण्यासाठी या शास्त्रीय उपाय शोधणे ते इतर शहरांना सुचविणे अशी देवाणघेवाण सुरु आहे.
महानगर पालिकेने 1 एप्रिल पासून ‘क्लायमेट चेंज’ विभाग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या विभागामार्फत तापमान वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय शोधले जाणार आहेत. मुंबई महानगर पालिकेने तापमानवाढीवर उपाय म्हणून ‘हरीत उर्जे’चा पर्याय स्विकारण्यास सुरवात केली आहे. यात, मध्य वैतरणा धरणावर 20 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प उभारण्या बरोबरच 80 मेगावॅट क्षमतेचे तरंगता सौर उर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याचबरोबर पालिकेच्या ज्या इमारती, भुखंडावर सौर उर्जा प्रकल्प उभारणे शक्य असेल अशा ठिकाणी प्रकल्प उभारणीला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर कचऱ्यापासून विज निर्मीती प्रकल्प उभारणीलाही प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच,खासगी वाहानांचा वापर कमी व्हावा म्हणून बेस्टचे तिकीट दर कमी करण्यात आले असून भविष्यात बॅटरीवर चालणाऱ्या बसेसची संख्याही वाढविण्यात येणार आहे, असे पालिकेच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
पाच ठिकाणी प्रदुषण मापके
केंद्र सरकारच्या ‘सफर’ उपक्रमाअंतर्गत नवी मुंबईसह मुंबईतील दहा ठिकाणी स्वयंचलित प्रदुषण मापके बसविण्यात आली आहे. आता महानगर पालिका मुंबईतील पाच ठिकाणी अशा प्रकारची प्रदुषण मापके बसविणार आहेत. यात, माहुल गाव, शिवाजी नगर देवनार, पंतनगर घाटकोपर, भायखळा विर माता जिजाबाई भोसले उद्यान, चारकोप प्रसुतीगृह या पाच ठिकाणी ही मापके बसविण्यात येणार आहेत.
mumbai news BMC to set up climate change department from next financial year
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.