आता बसेसची तिकिटेही IRCTC च्या संकेतस्थळावरून थेट बुक करा; नवीन सुविधा सुरु

कुलदीप घायवट
Saturday, 20 February 2021

आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर रेल्वे, विमान आणि क्रूझ तिकिट काढण्याची सुविधा होती. याचबरोबर आता प्रवाशांच्या सुविधेसाठी बस तिकिट काढता येईल

मुंबई, ता. 20:  इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) ने रेल्वे, विमान, क्रूझचे तिकीट काढण्याबरोबरच आता बसचे तिकिट देखील आरक्षित करता येणार आहे. ही सेवा देशातील 22 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी बस आणि राज्य परिवहन मंडळाच्या बसचे तिकीट काढणे सोयीस्कर होईल.

आयआरसीटीसी संकेतस्थळावर रेल्वे तिकिटे काढता येतात, तसेच आसन निवडण्यासाठी पर्यायही  उपलब्ध असतात. त्याचप्रकारची सुविधा  प्रवाशांना बसचे तिकीट काढताना मिळते. तशाच प्रकारे प्रवाशांना बसमधील आसन निवडता येणार आहे. तिकीट आरक्षित करणाऱ्या प्रवाशांना बसचा मार्ग, बसमध्ये मिळणाऱ्या सुविधा बघता येतील. बसचे तिकीट बँक आणि वॉलेटच्या माध्यमातून आयआरसीटीसीवरून काढल्यास  प्रवाशांना किंमतीत सवलत मिळणार आहे, अशी माहिती आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

महत्त्वाची बातमी : कोरोनाच्या विळख्यात अडकले राज्याचे मंत्री; दोन दिवसात 'हे' चार मंत्री झाले पॉझिटीव्ह

आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर रेल्वे, विमान आणि क्रूझ तिकिट काढण्याची सुविधा होती. याचबरोबर आता प्रवाशांच्या सुविधेसाठी बस तिकिट काढता येईल. ही सेवा महाराष्ट्रात नुकताच सुरू झाली असून तांत्रिक बाबीमध्ये सुधारणा केली जात आहे. देशातील एकूण  22 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशात सदर सेवा उपलब्ध आहे. 50 हजार खाजगी बस ऑपरेटर आणि राज्य परिवहनाच्या बसेसची तिकिटे IRCTC च्या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे अशी माहिती आयआरसीटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

प्रवाशांना बसचे तिकीट काढण्यासाठी  bus.irctc.co.in या संकेतस्थळावर जावे लागेल. त्यानंतर संकेतस्थळवर प्रवासाची तारीख, कोणत्या मार्गावर, कोणती बस उपलब्ध आहे, हे पाहता येणार आहे. त्यानुसार बस मार्ग निवडल्यानंतर प्रवासाचा कालावधी आणि वेळ दिसेल. तिकिटाचे शुल्क, शिल्लक राहिलेल्या तिकिटांची माहिती  मिळेल.

mumbai news book bus tickets from IRCTC website new service starts in maharashtra


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news book bus tickets from IRCTC website new service starts in maharashtra