क्राईम ब्रांचमधून बदली झाल्यानंतर वादग्रस्त अधिकारी सचिन वाझे आता दिसणार 'या' विभागात

क्राईम ब्रांचमधून बदली झाल्यानंतर वादग्रस्त अधिकारी सचिन वाझे आता दिसणार 'या' विभागात
Updated on

मुंबई,ता.12ः वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची गुन्हे शाखेतून नागरी सुविधा केंद्रात (सीएफसी) बदली करण्यात आली आहे. मनसुख हिरेन प्रकरणात एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. वाझे यांची बदली करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधीमंडळात केली होती.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी जिलेटिन भरलेली गाडी सापडली त्याबद्दलचा तपासात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) उडी घेतली आहे. हिरेन यांच्या ताब्यातील ही गाडीच अंबानी यांच्या घरासमोर होती. त्यानंतरच हिरेन यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत सापडला. अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांचा तपास सुरवातील सचिन वाझे यांच्याकडे होता. त्यामुळे हिरेन आणि वाझे यांचे संभाषण झालेले होते.

त्यानंतरच वाझे यांचे नाव गेले काही दिवस चर्चेत होते. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमकपणे थेट वाझे यांच्या अटकेची मागणी केली होती. हिरेन यांच्या पत्नीनेही वाझेंनी आपल्या पतीचा खून केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर विरोधकांनी वाझेंना हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर गुरूवारी रात्री उशीरा वाझे यांची बदल विशेष शाखेत करण्यात आली असून त्यांच्याकडे नागरी सुविधा केंद्राची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे वरिष्ठ अधिका-याने सांगितले. शुक्रवारी त्यांनी सीआययूच्या प्रभारी पदभार सोडला.

कारचा चेसी क्रमांक खोडलेला

अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा चेसी नंबर खोडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हा चेसी नंबर खोडल्याप्रकरणी एटीएस ने एका गॅरेज मालकाचा जबाब नोंदवल़्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एटीएसला असा संशय आहे की, संबधित स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा चेसीनंबर हा त्या गॅरेजमध्ये खोडण्याचा प्रयत्न केला गेला.

मनसुख हिरेन प्रकरणात एटीएसने बुधवारी रात्री 'क्राइम सीन' तयार केला. मुंब्रा खाडी ज्या ठिकाणी हिरेनचा मृतदेह मिळून आला. त्या ठिकाणी ही तपासणी करण्यात आली. हिरेन यांचा ज्या दिवशी मृत्यू झाला. त्या दिवशीच्या वातावरणाचा अभ्यास करून हे प्रत्याक्षिक करण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार मृतदेह सापडलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात कांदळवनाचा झाडे आहेत. त्यामुळे मृतदेह वाहत पुढे जाणं शक्य नसल्याचे तेथील स्थानिकांच मत असल्याचं निरीक्षणही नोंदवण्यात आले.  त्यामुळे तेथून मृतदेह फेकण्यात आला असावा असा अंदाज आहे.

controversial police officer sachin vaze transferred to CFC department

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com