राज्यात 'सहा' जिल्ह्यांमधील सरासरी कोविड मृत्यूंमध्ये ‘लक्षणीय’ वाढ; घरंगळलेला कोरोना मृत्यूदर वाढला

भाग्यश्री भुवड
Saturday, 20 February 2021

रत्नागिरीमध्ये गेल्या तीन आठवड्यांमध्ये दररोज मृत्यूचे प्रमाण 0.14 टक्क्यांवरून 1.28 वर वाढल्याचे नमूद झाले

मुंबई, 20 : गेल्या आठवड्यापासून राज्यात कोरोना रुग्ण वाढत असताना मृत्यूदर देखील वाढल्याची नोंद करण्यात आली. राज्यातील गेल्या चार दिवसांतील कोरोना मृत्यू पाहिल्यास सोमवारी 23, मंगळवारी 39, बुधवारी 40, गुरुवारी 38 तर काल शुक्रवारी 44 मृत्यूची नोंद करण्यात आली. सोमवारपासून रुग्ण आणि मृत्यू दोन्ही सतत वाढते असल्याने आता प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. जानेवारी महिन्यातील 30.7 मृत्यूदर फेब्रुवारीत 22.85 वर गेला. मात्र मागच्या आठवड्यापासून हे प्रमाण 31.1 टक्क्यांवर आले आहे. 

गेल्या तीन आठवड्यात बर्‍याच जिल्ह्यांमध्ये दररोजच्या कोविड -19 मृत्यूंमध्ये वाढ झाली आहे. रत्नागिरी, बीड, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा आणि अमरावती या सहा जिल्ह्यांमध्ये दैनंदिन मृत्यूंमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 

महत्त्वाची बातमी : तुमचे डिपॉझिटचे पैसे मिळाले का ? वैद्यकीय महाविद्यालयांनी अडवली हजारो विद्यार्थ्यांची अनामत रक्कम

अमरावतीत फेब्रुवारी 5 आणि 11 या कालावधीत मृत्यचे प्रमाण 0.85 टक्के इतकं होतं. तर, या मृत्युदराचे प्रमाण वाढून 12 ते 18 या कालावधीत 1.71 पर्यंत झाले. 

याच काळात, सातार्यामध्ये मृत्यू प्रमाण 0.85  वरून 1.14 पर्यंत पोहोचले. बीड मध्ये मृत्यू प्रमाण 0.57 वरून 1.28 आणि रायगडमध्ये 1.85 वरुन सरासरी 5.7 मृत्यू झाले आहेत. (आकडेवारी टक्क्यांमध्ये ). महाराष्ट्रात आतापर्यंत 51 हजार 669 एवढे मृत्यु झाले आहेत. ज्याचे प्रमाण भारतातील एकूण मृत्यृंच्या तुलनेत तीन पट आहेत. 

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मृत्यूंची संख्या वाढत असताना, सक्रिय प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ दिसून येत नाही. याचे कारण म्हणजे या जिल्ह्यांमधील संपर्क ट्रेसिंग आणि चाचण्यांचे प्रमाण कमी नोंदवण्यात आले आहे. राज्य टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक म्हणाले यांनी सांगितले की, चाचणी संख्या वाढवण्याची गरज आहे आणि अँटीजेन चाचण्यांवर जास्त अवलंबून राहणे आवश्यक आहे. तर, रत्नागिरीमध्ये गेल्या तीन आठवड्यांमध्ये दररोज मृत्यूचे प्रमाण 0.14 टक्क्यांवरून 1.28 वर वाढल्याचे नमूद झाले आहे. 

महत्त्वाची बातमी डुप्लिकेट पोलिस बनून फाईव्ह स्टार हॉटेलवर टाकली धाड; 12 कोटी केले लंपास

राज्य टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरीमध्ये आधीपासूनच कमी केसेस आहेत. त्यातही मृत्युचे प्रमाण कमी होते. लोक उपचारांसाठी उशिरा येत आहेत. काही जिल्ह्यात रुग्णालयातील डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. 

mumbai news corona death rate in maharashtra increased in the month of February 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news corona death rate in maharashtra increased in the month of February