Corona Vaccination: सोमवारपासून मंगळवार वगळता पाच दिवस होणार लसीकरण

भाग्यश्री भुवड
Sunday, 24 January 2021

राज्यात शनिवार 290 केंद्रांवर 24 हजार 282 (83 टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले.

मुंबई: राज्यात शनिवार 290 केंद्रांवर 24 हजार 282 (83 टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. राज्यात काल सर्वात जास्त गोंदीया जिल्ह्यात 143 टक्के लसीकरण झाले आहे. पाठोपाठ गडचिरोली, वर्धा, अमरावती, जालना, बीड, धुळे, हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात 100 टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाले. सोमवारपासून मंगळवार वगळता पाच दिवस लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे. 31 जानेवारीला पोलिओ लसीकरण असल्याने 30 जानेवारीचे कोरोना लसीकरण सत्र होणार नाही.

शनिवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून काही ठिकाणी लसीकरणाचे सत्र उशिरापर्यंत सुरु होते. त्यामुळे अंतिम आकडेवारीत बदल होऊ शकतो. राज्यात आतापर्यंत एकूण 99 हजार 242 जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली. राज्यात काल 297 जणांना कोव्हॅक्सीन लस देण्यात आली असून आतापर्यंत एकूण 1572 जणांना ही लस देण्यात आली आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शनिवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत लसीकरणाची आकडेवारी अशी (कंसात दैनंदिन लसीकरण झालेले कर्मचारी, टक्के आणि आतापर्यंतची एकूण संख्या) 

अकोला (258), अमरावती (575), बुलढाणा (469) वाशीम (233), यवतमाळ (329 टक्के), औरंगाबाद (936 ), हिंगोली (208), जालना (452), परभणी (173), कोल्हापूर (848), रत्नागिरी (341), सांगली (871), सिंधुदूर्ग (210), बीड (554), लातूर (595), नांदेड (520), उस्मानाबाद (301), मुंबई (1484), मुंबई उपनगर (2033), भंडारा (263), चंद्रपूर (476), गडचिरोली (542), गोंदिया (428), नागपूर (1056), वर्धा (715), अहमदनगर (870), धुळे (435), जळगाव (664), नंदुरबार (308), नाशिक (733), पुणे (1853), सातारा (772), सोलापूर (1082), पालघर (314), ठाणे (2201), रायगड (180)

----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai news Corona Vaccination five days Monday to Saturday Exclude tuesday


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai news Corona Vaccination five days Monday to Saturday Exclude tuesday