Versova Beach
Versova Beach

Versova Beach: वर्सोवा समुद्राच्या भरती प्रवाहात अडकले जोडपे, पोलिसांनी जीव धोक्यात घालून सुरक्षित काढले बाहेर

Published on

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण राज्यभरात  मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मुंबईच्या विविध चौपाटीवर बुडून आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. अशातच मुंबईच्या प्रसिद्ध वर्सोवा चौपाटीवर फिरण्यासाठी आलेले जोडपे समुद्राला आलेल्या भरती प्रवाहात अडकून राहिले.

मात्र सुदैवाने या ठिकाणी वर्सोवा पोलीस गस्त घालत असताना भरतीच्या पाण्यात आणि ट्रायपॉड दगडांमध्ये अडकलेले जोडपे दिसून आले क्षणाचाही विलंब न करता वर्सोवा पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालून या जोडप्याला सुरक्षित बाहेर काढले.

दोन दिवसापूर्वी मुंबईच्या वर्सोवा चौपाटीवर एक मद्यधुंद जोडपं फिरण्यासाठी आले. दोघेही किनाऱ्यावरील ट्रायपॉड दगडांमध्ये गप्पा मारत बसले असताना सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास समुद्राला मोठी भरती आली आणि भरतीचे पाणी किनाऱ्यावर असलेल्या ट्रायपॉड दगडांवर आढळू लागले.

Versova Beach
Kolhapur Gold Biscuits : तळ्याकाठी खेळताना मुलांना सापडली 24 लाख किमतीची सोन्याची बिस्किटे; 'त्यांना' सुगावा लागताच..

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या जोडप्याला बाहेर पडणे अवघड झाले. ही गोष्ट येथील एका पर्यटकांनी गस्तीवर असलेल्या वर्सोवा पोलीस ठाण्याचे व पोलीस निरीक्षक गणेश पवार यांना सांगितली. त्यांनी त्वरित वर्सोवा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन त्या मद्यधुंद जोडप्याला सुरक्षित बाहेर काढले. (latest marathi news)

Versova Beach
Maharashtra Rain Updates : ठाणे, पालघर अन् रायगडला आजही रेड अलर्ट!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com