
राज्यपालांची भेट न झाल्याने आंदोलकांनी निवेदन फाडून राज्यपालांविरोधात संताप व्यक्त केला.
मुंबई - केंद्र सरकारच्या कृषि कायद्यांच्या विरोधात दिल्लीत शेतकरी आणि कामगांराचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील शेतकरी संघटनांनी चलो मुंबईचा नारा दिला होता. आज आंदोलक शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी भेटून निवेदन देणार होते. परंतु राज्यपालांची भेट न झाल्याने आंदोलकांनी निवेदन फाडून राज्यपालांविरोधात संताप व्यक्त केला.
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी आणि कामगार संघटनांनी आंदोलन पुकारले होते. चलो मुंबईचा नारा देत राज्यातील विविध भागातून शेतकरी मुंबईत दाखल झाले. मोर्चाला भाजपइतर पक्षांनी या मोर्चाला पाठिंबा दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेतकरी कामगार पक्ष. कॉंग्रेसच्या नेत्यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. शरद पवार, बाळासाहेब थोरात, भाई जगताप, अजित नवले, अशोक ढवळे, मेधा पाटकर आदी नेत्यांनी केंद्र सरकारवर भाषणात जोरदार टीका केली.
मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
आंदोलक राजभवनाकडे कूच करण्यासाठी निघाले असताना, त्यांना पोलिसांनी अडवले. पोलिसांनी राजभवनाकडे जाणाऱ्या आंदोलकांना समजावून सांगितले. राज्यपालांनी आंदोलकांना भेटीचे आश्वासन दिले होते. परंतु राज्यपाल राजभवनावर उपस्थित नसल्यामुळे, आंदोलकांनी संताप व्यक्त केला. शेतकरी नेते अशोक ढवळे यांनी केंद्र सरकार, कृषि कायदे आणि राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यावर टीका केली. राज्यपालांना देण्यात येणारे निवेदन फाडून आंदोलकांनी त्यांच्या कृतीचा निषेध करण्यात आला.
दरम्यान, राज्यपालांवर आंदोलकांनी केलेल्या आरोपांवर राज्यपाल कार्यालयाने स्पष्टीकरण दिले, राज्यपाल पूर्व नियोजित कार्यक्रमासाठी गोव्यात असल्याचे सांगण्यात आले आहे.
Farmers protest the governors action by tearing up the statement
----------------------------------------------------