जूहू बीचवर क्लिनअप मार्शल आणि पर्यटकांमध्ये हाणामारी; कायदा हातात घेऊन दंड वसूल केल्याचा आरोप

जूहू बीचवर क्लिनअप मार्शल आणि पर्यटकांमध्ये हाणामारी; कायदा हातात घेऊन दंड वसूल केल्याचा आरोप

मुंबई : मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा वाढताना पाहायला मिळतोय. काल मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा आठशेच्या वर जाताना पाहायला मिळाली. गेल्या सात दिवसात कोरोना रुग्णसंख्येचा चढता आलेख आहे. अशात नागरिकांनी कोरोनाबाबतचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावे अशा वारंवार सूचना करण्यात येत आहेत. मात्र असं असतानाही नागरिक कोरोनाला गंभीरतेने घेत नाही. रस्त्यावरून चालताना, सार्वजनिक ठिकाणी नागरिक मास्कचा वापर करत नाहीत. कोरोना रुग्णसंख्या पुन्हा कमी करण्यासाठी प्रशासन कामाला लागलंय. ज्या नागरिकांनी मास्क लावलेले नाहीत अशा नागरिकांकडून दंड देखील आकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर मुंबईतील जुहू बीचवर क्लिनअप मार्शल जोर जबरदस्ती करून पर्यटक आणि नागरिकांकडून दंड वसूल करत असल्याचे आरोप केले जात आहेत. याबाबतचे दोन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हयरल झाले आहेत. यातील एक व्हिडीओ कालचा आणि एक व्हिडीओ आजचा असल्याचं समजतंय. या व्हिडिओत दंड वसूल करणारे क्लिनअप मार्शल पर्यटक आणि नागरिकांसोबत जोरजबरदस्ती करताना पाहायला मिळतायत. कालांतराने जोरजबरदस्तीचे रूपांतर हाणामारीतही झाल्याचं पाहायला मिळतंय.  

दरम्यान, क्लिनअप मार्शलकडून गुंडगिरी केल्याचा आरोप नागरिक करतायत. त्यामुळे कायदा हातात घेऊन गुंडगिरी करणाऱ्या या क्लिनअप मार्शलवर मुंबई महानगरपालिका किंवा मुंबई पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणीही जोर धरतेय. याप्रकरणी सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये विचारणा केली असता वरीष्ठ पोलिस निरीक्षक एस गणोरे यांनी सदर प्रकरणाची चैकशी सुरु असल्याचं म्हटलंय. 

mumbai news fight between cleanup marshal and tourists on Juhu Beach Tourists

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com