कुणाल खेमूला दंड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

मुंबई - चाहत्यांसोबत रस्त्यात सेल्फी काढल्याप्रकरणी अभिनेता वरुण धवनला मुंबई पोलिसांनी दंड ठोठावल्याची घटना ताजी असतानाच विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या अभिनेता कुणाल खेमूला वाहतूक पोलिसांनी मंगळवारी पाचशे रुपयांचे ई-चलान पाठविले. विनाहेल्मेट दुचाकीवरून जात असतानाचे कुणालचे छायाचित्र मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅंडलवर अपलोड झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी ट्विटरवरच दंडाचे चलान अपलोड केल्यानंतर कुणालने चुकी मान्य करत माफी मागितली. माझे ट्विटरवरील छायाचित्र पाहिल्यावर माझीच मला लाज वाटत असल्याचे ट्विट त्याने केले.
Web Title: mumbai news fine to kunal khemu