रुकय्याच्या तोंडातून निघालं शंकराचार्यांचं लॉकेट

हर्षदा परब
बुधवार, 12 जुलै 2017

डॉ. मशाल यांच्याबरोबर त्यांचे सहाय्यक डॉ. विनोद गिते यांनी 30 मिनिटात शस्त्रक्रिया पूर्ण केली. कॅमेरा असलेला काठीसारखा प्रोब घशात सोडून मॉनिटरवर आतली हालचाल पाहता आली. त्याच प्रोबच्या सहाय्याने ते लॉकेट डॉक्टरांनी  बाहेर काढले. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेममध्ये बाळाला चीरा-टाका बसत नसल्याने रक्तस्त्राव होत नाही. 

मुंबई : जोगेश्वरीच्या आदर्श नगर येथे राहणाऱ्या रुकय्या सनिफ खान या बाळाच्या अन्ननलिकेतून डॉक्टरांनी शंकराचार्यांच लॉकेट काढले. 

उलट्या, श्वास घ्यायला त्रास होत असल्याने रुकय्याला घेऊन तिच्या कुटुंबीयांनी कुपर रुग्णालयात धाव घेतली. सोमवारी (11 जुलै) दुपारी तीनच्या सुमारास रुकय्या आली तेव्हा डॉक्टरांनी एक्सरे काढण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये रुकय्याने काहीतरी वस्तू गिळल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. पण सहा तास पोट रिकामे असणं आवश्यक असल्याने रात्री अकराच्या सुमारास शस्त्रक्रिया केल्याचे कुपर रुग्णालयाच्या कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख डॉ. शशिकांत मशाल यांनी सांगितले. मुलाला त्रास होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतल्याने बाळाच्या अन्ननलिकेला फार दुखापत झाली नव्हती. 

डॉ. मशाल यांच्याबरोबर त्यांचे सहाय्यक डॉ. विनोद गिते यांनी 30 मिनिटात शस्त्रक्रिया पूर्ण केली. कॅमेरा असलेला काठीसारखा प्रोब घशात सोडून मॉनिटरवर आतली हालचाल पाहता आली. त्याच प्रोबच्या सहाय्याने ते लॉकेट डॉक्टरांनी  बाहेर काढले. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेममध्ये बाळाला चीरा-टाका बसत नसल्याने रक्तस्त्राव होत नाही. 

रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार बाळाने मंगळवारी रात्री खायला सुरुवात केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news girl swallows locket