Mumbai News : सीएसएमटीमधील हेरीटेज रेल्वे इंजीन्स लोणावळ्यात शिफ्ट होणार; कारण...

Mumbai News
Mumbai News

मुंबई : वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा असणाऱ्या सीएसएमटी स्थानकांतील प्लॅटफॉर्म क्रमांक अठरावर असलेली 'हेरिटेज गल्ली' आता लोणावळ्यात हलविण्यात येणार आहे. सीएसएमटी स्थानकांच्या पूर्णविकासामुळे मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बच्चेकंपनीपासून तर थोरामोठ्यापर्यत आकर्षण असलेली रेल्वेची 'हेरिटेज गल्ली' भेट देता येणार नाहीत.

Mumbai News
ST Bus : आषाढी यात्रेसाठी ८ लाख ८१ हजार विठ्ठलभक्तांनी केला प्रवास! एसटीला २८ कोटींचे उत्पन्न

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्र.१८ जवळील मोकळय़ा जागेत हेरिटेज गॅलरी म्हणून मध्य रेल्वेकडून सुरु करण्यांत आली होती. या हेरिटेज गल्लीत ब्रिटिशकालीन वाफेवर चालणारी क्रेन, स्टोन क्रशर मशीन, पहिले इलेक्ट्रिक इंजिन, हॅण्ड टय़ूब फायर इंजिन, काँक्रीट मिक्सर, प्रींटिंग प्रेस मशीन अश्या ऐतिहासिक मशीनरी ठेवण्यात आली आहे.

या 'हेरिटेज गल्ली' ला दररोज शेकडो पर्यटक भेट देत होते. मात्र, आता अहलुवालिया कंन्स्ट्रक्शन कंपनीकडून सीएसएमटी स्थानकांचे पुर्णविकास काम पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार आहे.

त्यामुळे "हेरिटेज गल्ली लोणावळ्यात स्थलांतरित केली जाणार. त्यासाठी किमान दोन महिने लागतील कारण इंजिन आणि इतर वस्तू ठेवण्यासाठी सुरक्षित जागा तयार करावी लागणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळला दिली आहे.

Mumbai News
NCP Constitution: शरद पवारांशिवाय अजितदादांच्या गटाचे पान हलणार नाही, NCP ची घटना काय सांगते?

काय आहे हेरिटेज गल्ली

मुंबईला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या समोर भारतीय रेल्वेचा इतिहास उलगडावा, भारतीय दळणवळणातील टप्पे त्यांना अभ्यासात यावेत, यासाठी २०१० साली सीएसटी रेल्वे स्थानकात हेरीटेज गल्ली सुरू करण्यात आली आहे. या हेरिटेज गल्लीत ब्रिटिशकालीन वाफेवर चालणारी क्रेन, स्टोन क्रशर मशीन, पहिले इलेक्ट्रिक इंजिन, हॅण्ड टय़ूब फायर इंजिन, काँक्रीट मिक्सर, प्रींटिंग प्रेस मशीन पर्यटकांसाठी ठेवण्यांत आल्या आहे. मात्र, आता मुंबईकरांना हेरिटेज गल्ली भारतीय रेल्वेच्या इतिहासाला उजाडा देता येणार नाही.

असा होणार पुर्णविकास

विमानतळाच्या धर्तीवर सीएसएमटी स्थानकाचे पुनर्विकास होणार आहे. सीएसएमटी स्थानकाची भव्य हेरिटेज वास्तू पाहण्यासाठी हॅरिटेज गॅलेरी उभारण्यात येणार आहे. फलाट क्रमांक १८ मध्ये प्रवेश केल्यानंतर कॅफे टेरिया, प्रवाशांना बसण्याची जागा केली जाणार आहे.स्थानकात प्रवाशांसाठी प्लाझा ,रिटेल, कॅफेटेरिया, करमणूक सुविधा असतील. फूड कोर्ट, वेटिंग लाउंज, स्थानिक उत्पादनांसाठी जागा उपलब्ध केली जाणार आहे. मेट्रो, बस वाहतुकीचे केंद्रीकरण करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com