बारावीच्या उत्तरपत्रिका बोर्डाकडे देणार नाही

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

मुंबई - प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने सोमवारी (ता. 26) आझाद मैदान दणाणून सोडले. सोमवारपासून तपासलेल्या उत्तरपत्रिका, गुणपत्रिका बोर्डात जमा न करण्याचा निर्णय महासंघाने जाहीर केला.

शिक्षणमंत्री विनोद तावडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत मागण्यांच्या पूर्ततेसंदर्भात झालेल्या बैठका निष्फळ ठरल्यानंतर सोमवारी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी आझाद मैदानात आंदोलन केले. बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीबाबतचा आगाऊ इशारा महासंघाच्या वतीने यापूर्वीच देण्यात आला होता. त्यामुळे सोमवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुन्हा महासंघाला बैठकीसाठी बोलावले होते; मात्र चर्चा निष्फळ ठरल्याची खंत महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी दिली.

मंगळवारी (ता. 26) दुपारी 3 वाजता शिक्षणमंत्र्यांसोबत पुन्हा चर्चा केली जाणार आहे. या चर्चेला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही आमंत्रित केले जाणार आहे. कनिष्ठ महासंघाच्या आंदोलनाला शिक्षक परिषदेनेही पाठिंबा दिला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news hsc answer paper board