Mumbai News : 'बेस्ट'च्या दुर्घटनात वाढ! तीन अपघातात दोन ठार

mumbai best bus service
mumbai best bus service sakal

मुंबई - बेस्ट ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते. सर्वात सुरक्षित प्रवास अशी बेस्टची ओळख आहे. मात्र गेल्या काही दिवसात बेस्ट बसच्या दुर्घनांमध्ये वाढ झाली आहे. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला. बेस्टच्या प्रतिमेला या दुर्घटना गालबोट लावणा-या आहेत.

mumbai best bus service
Modi's Shamless Selfie: PM मोदींचा शेमलेस सेल्फी! पंतप्रधानांनी रिट्विट केली अमेरिकन खासदाराची पोस्ट

ओलेक्ट्रा कंपनीची भाडेतत्त्वावरील बस गायवाडी गिरगाव येथून जात असताना रस्ता पार करणारी एक वृद्ध महिला बसच्या पुढील चाकात सापडली. त्यानंतर या वृद्ध महिलेला भाटिया रुग्णालयात दाखल केले असता रुग्णालयात उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला.

‘बेस्ट’ बसमध्ये हृदयविकारामुळे एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. वरळी डेपोची कुलाबा येथे जात होती. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. मालवणी बस डेपोत उभ्या असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या वातानुकूलित इलेक्ट्रिक बसने पेट घेतला. गेल्या शुक्रवारी ही घटना घडली असून अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

mumbai best bus service
Ajay Sengar: अजय सेंगर पुन्हा बरळले! संविधानविरोधी वक्तव्य केल्यानं आंबेडकरवादी कार्यकर्त्यांकडून चोप

टाटा मोटर्स लिमिटेड या कंत्राटदाराची ही मिनी वातानुकूलित इलेक्ट्रीक बस होती. मालवणीमध्ये चार्जींग करताना बेस्टच्या इलेक्ट्रीक बसमध्ये आग लागल्याची घटना घडली. या बसेस टाटा मोटर्सने पुरवल्या होत्या. ही घटना आम्ही गांभीर्याने घेत आहेत. आगीचे नेमके कारण आम्ही जाणून घेत आहोत. त्यानुसार योग्य दुरूस्ती केली जाईल, असे स्पष्टीकरण टाटा मोटर्सने दिले होते.

बेस्टच्या ताफ्यात पूर्वी असलेल्या बसची दुरूस्ती होत होती. प्रत्येक बस काळजीपूर्वक तपासून रस्त्यावर आणल्या जात होती. त्यामुळे दुर्घटनेचे प्रमाण कमी होते. पण आता कंत्राटदाराला बेस्टच्या बस चालवायला देण्यात आल्या आहेत. ते बसची काळजी नसल्याचे दिसून येत आहे. रस्त्यात आणल्या जात आहे. बस चालविणारे वाहक आणि चालक हे सुध्दा कंत्राटी कामगार आहेत. त्यामुळे दुर्घटनांची संख्या वाढत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com